येथे झालेल्या शुक्रवारच्या (दि.28) पत्रकार परिषदेत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले. यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल ,भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी विशेषतः पोलीस प्रशासनाच्या बाबतीत त्यांनी गंभीर भूमिका घेण्याचे आदेशच दिले आहे. धुळे जिल्ह्यात भूमाफिया आणि अवैध धंद्यांचा प्रश्न गंभीर झाला असून याच्यावर पोलीस प्रशासनाला नियंत्रण ठेवावे लागेल. गुंड प्रवृत्तीच्या माध्यमातून बाहेरगावी राहणाऱ्या व्यक्तींच्या घरांवर अतिक्रमण केले जाते. दादागिरी करून त्यांची मालमत्ता हडप केल्याचा प्रकार होतो आहे. पण आता यापुढे हा प्रकार सहन केला जाणार नाही. मालमत्ता अतिक्रमण झालेली असेल अशा व्यक्तींनी तातडीने पोलीस विभागात तक्रार करावी. पोलीस प्रशासनाने देखील कोणताही दडपणाला बळी न पडता कारवाई करावी असा इशारा त्यांनी केला आहे. धुळे जिल्ह्याचा गुन्ह्याचा रेट देखील कमी झाला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला असून त्याची वर्क ऑर्डर देखील काढण्यात आली आहे. मात्र या कामांचा दर्जा घसरणार नाही. याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेतली पाहिजे .कामाच्या दर्जाच्या बाबतीत आपण कोणतीही तडजोड करणार नाही. या वर्क ऑर्डर किंवा आणखी कोणत्याही कामाच्या मोबदल्यासाठी आपण कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही .त्यामुळे प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आलेल्या निधी वेळेत खर्च केला पाहिजे .कामात कसुरी करणाऱ्या कुणालाही सोडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
0 Comments