शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी---- शिंदखेडा व शिरपुर विधानसभा मतदारसंघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दौऱ्यात शिरपूर तालुक्यातील हिगोंणीपाडा दुर्लक्षीत आदिवासी गावाला भेट व शिंदखेडा
येथील शेतकऱी कै. सतीश जगन्नाथ देसले यांच्या कुटुंबीयांची भेट देऊन सात्वन्न आदींसह विविध प्रकारच्या मागण्या व समस्या घेऊन शिंदखेडा येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी हितगुज करताना सर्व प्रकारच्या समस्यांचे बारकाईने अभ्यास होत असून निश्चितच सर्व सामान्यांना दिलासा दिला जाईल असे सांगताना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सत्तेत आल्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करू पण 100 दिवसात 500 आत्महत्या नापिकीमुळे तर काही ठिकाणी पिकांमुळे शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकरी मालाला भाव नाही .हे सरकार शेतकरी विरोधात आहे. गद्दारचे आहे. दिशाभूल करणारे आहे.असा घाणाघात आपल्या मनोगतात व्यक्त करताना चांगलाच समाचार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात घेतला.
परिसरातील शेतकऱ्यांच्या व्यथा व अडचणी जाणून घेण्यासाठी शिरपूर व शिंदखेडा दौऱ्यावर आले होते. शिरपूर तालुक्यातील हिगोंणीपाडा दुर्लक्षीत आदिवासी गावाला भेट दिली असता झोपडपट्टीत राहणाऱ्या आदिवासी समवेत खाटेवर बसून शांतपणे समस्या ऐकून घेत असताना त्यांच्या मनातील व्यथा समजून निश्चितच माझ्या हृदयात भिनल्या आहे त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. ह्यावेळी तालुकाप्रमुख अत्तर सिंग पावरा, ग्रामीण उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत, जिल्हा संघटक मंगेश पवार सहसंघटक भाईदास पाटील, माजी सभापती विश्वनाथ पाटील यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर शिंदखेडा येथील गांधी चौकात रहिवासी शेतकरी स्व. सतीश जगन्नाथ देसले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धिर देत न्याय दिला जाईल . शिंदखेडा येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, हा मतदार संघ धन धाग्यांचा आहे पण सर्वसाधारण माणूस पेटून उठला तर या धनाढ्यांना हाणून पाडतील यात शंका नाही
प्रोत्साहणपर भरपाई मिळणार असल्याचे जाहीर केले होते एवढ्या दिवस का थांबवले शेतकऱ्याला अडवण्याचं व रडण्याचे काम सरकार करत आहे असेही ते यावेळी म्हणाले .
जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून पन्नास हजार रुपये प्रोत्साहणपर अनुदान प्रमाणपत्र शेतजाऱ्यांना श्री. दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केले.हयाप्रसंगी
जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, संपर्कप्रमुख हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख मंगेश पवार, शानाभाऊ सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव (छोटु ) पाटील, माजी आमदार शरद पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले, तालुका संघटक भाईदास पाटील, सर्जेराव पाटील, माजी सभापती दाजभाऊ बोरसे, शिवसेनेचे माजी प्राचार्य प्रदीप दिक्षित,तालुका समन्वयक विनायक पवार, विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी, जेष्ठ शिवसैनिक चंद्रकांत ठाकूर, शहराध्यक्ष संतोष देसले, नंदकिशोर पाटील, गुलझार सिंग गिरासे, भटु अहिरे आधी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments