शिंदखेडा ( प्रतिनिधी)-
तालुक्यातील आलाणे येथील ४९ वर्षीय शेतकरी ईश्वर विजयसिंग गिरासे आलाणे शिवारातील बुराई नदी पात्रातील पाण्यात बुडाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून
चुलत भाऊ दिवाणसिंग गिरासे यांनी खाजगी वाहनाने शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पवार यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे...

0 Comments