नरडाणा---*राष्ट्रीय सेवा योजना युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार 31 ऑक्टोबर हा दिवस माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म दिवस " राष्ट्रीय एकता दिवस "म्हणून साजरा करण्यात यावा त्यानुसार म. दि. सिसोदे कला, वाणिज्य महाविद्यालय नरडाणा येथे राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान पाटील यांनी पूजन करून राष्ट्रीय एकतेचे महत्व थोडक्यात विषद केले. महाविद्यालयाचे ओ. एस. श्री आर, ओ. पाटील.डी. व्ही. बोरसे. फारुख दादा, शैलेंद्र सिसोदे, साळुंखे भाऊसाहेब, संजय बोरसे, मोरेश्वर सिसोदे, शैलेश भामरे व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय धिवरे उपस्थित होते.
0 Comments