Header Ads Widget

*शिंदखेडा येथे राज्य सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र जाहीर निषेध व तहसीलदार यांना निवेदन*.

         
 
  शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी -
आज शिंदखेडा येथे तहसीलदार कार्यालया समोर युवक राष्ट्रवादी पक्षाचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष इं. निखील पाटील यांच्या नेतृत्वात युवक राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील राज्य सरकारचा 


निवेदन देऊन व निषेधाचे फलक दाखवत जाहीर निषेध करण्यात आला तसेच शिंदे व फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
 महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरात राज्याचे हीत जोपासणारे शिंदे - फडणवीस हे महाराष्ट्राचे द्रोही आहेत. महाराष्ट्रातील उद्योग धंदे व महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायचे म्हणजे महाराष्ट्राचे महत्व कमी करणे हा एकमेव उद्योग सध्याच्या भाजपा शिंदे फडणवीस सरकारचा आहे.
शिंदे - फडणवीस सरकार हे गुजरातचे एजंट होऊन एका पाठोपाठ एक उद्योग गुजरातला पाठवत आहेत. एकदिवस हे सरकार मुंबईसारख्या आर्थिक राजधानीला सुद्धा गुजरातला देऊन टाकतील की काय ? हा प्रश्न महाराष्ट्रातील उद्योजक व तरुणांना पडला आहे.
देशात विकसित राज्यामध्ये महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य असल्यानेच देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलविण्याचा सपाटा लावला आहे. दुर्दैवाने शिंदे फडणवीस सरकार त्यांच्या इशारावर काम करीत असल्यानेच महाराष्ट्राचे महत्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. महाराष्ट्राचे हीत डावलून गुजरात हिताला जास्त महत्व दिले जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबवले होते. त्यातील
पुढील उद्योग व कंपन्या गुजरातच्या घश्यातून वाचल्या आहेत. त्यामध्ये मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, मरीन अकादमी, डायमंड बोर्स इत्यादी प्रकल्प व कंपन्या महाराष्ट्रात आजही काम करीत आहेत. त्यामुळे रोजगार निर्मिती होत आहे.शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात वेदांत फोक्स्कोन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअर बस हे अत्यंत मोठे प्रकल्प आज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गुजरातला गेले आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्यामुळे शिंदे महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी. - फडणवीस सरकारने राजीनामा देऊन नोटबंदी, जीएसटी, कोविड महामारी, अतिवृष्टी मुळे स्थानिक उद्योग बंद पडत आहेत. यामुळे
सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, उद्योजक व व्यापारी अडचणीत सापडले आहेत. तरी महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरात राज्याच्या घश्यात घालणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आले यावेळी दिपक दादा जगताप (ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष धुळे जिल्हा)प्रवीण पाटील ( शहराध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस शिंदखेडा शहर)आनंदराव पाटील (शिंदखेडा ता उपाध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस)ईश्वर माळी (जिल्हा संघटक ओ बी सी सेल ) बलवंत बाबा सिसोदे अॅड निलेश देसले, हिमांशु पाटील,  धनराज पाटील, योगेश पाटील,  मिलींद देसले, देवराम माळी, हर्षदीप वेंदे, नरेश कोळी, चेतन देसले ,गोलू देसले, किरण देसले, भुषण पाटील, बापुजी मिस्तरी राष्ट्रवादी युवक काॅंग्रसचे व सर्व सेलचे 
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments