शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतिदिन तसेच "राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेत
या प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम यांनी प्रथमतः सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी या दोघे महात्म्यांच्या प्रतिमांचे पूजन करून श्रीफळ पुष्प पुष्पहार बहाल करण्यात आले तद्नंतर विद्यालयातील मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद यांनी " राष्ट्रीय एकात्मतेची शपथ "घेण्यात आली यावेळेस मा.मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व कर्तव्यनिष्ठ कर्तबगार महिला श्रीमती इंदिरा गांधीजी यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिलेत व त्यांनी एकात्मविषयीचे महत्त्व विशद करतांना "जहाॅ चाह है , वहाॅ राह है। एकाताचे बल म्हणजे सर्वात मोठी शक्ती असते आणि आपण एकात्मतेच्या भावनेने जगू या! आणि जगात आपल्या देशाचे अस्तित्व गाजवू या!"अशी भावना रूढ ठेवून एक आदर्श डोळ्यासमोर ठेऊ या! अशा प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.बी.भदाणे सरांनी केले तर
आभार श्री.सी.जी.वारूडे सरांनी मानले.
0 Comments