Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यात रस्त्यावर येणारे झाडे-झुडपे त्वरीत काढा-- सुरज देसले यांची मागणी*




   शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी--                शिंदखेडा शहरापासून शिंदखेडा ते होळ पुढे गोराणे फाटा , होळ ते नरडाणा पुढे बेटावद पर्यन्त , चिमठाणे ते विखरण पुढे दोंडाईचा ते निमगुळ ,  शिंदखेडा विरदेल पुढे दोंडाईचा , शिंदखेडा ते चिमठाणे पुढे वाडी शेवडी बॅरेंज पुढे देगाव ते सतारे , शिंदखेडा ते वरपाडे ,शिंदखेडा ते वर्षी पुढे नॅशनल हायवे पर्यंत  , शिंदखेडा ते पाटण पुढे सुकवद व्हाया शिरपूर या गावांकडे जात असल्याने या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहनांची ,  विद्यार्थ्यांची व पायी जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. रस्त्यालगत काटेरी झाडे झुडपे मोठया प्रमाणावर वाढलेले असल्याने झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने समोर येणार वाहन दिसत नसल्याने अपघात देखिल होत असतात. 
                   शिंदखेडा ते होळ पुढे गोराने फाटा , शिंदखेडा ते विरदेल पुढे दोंडाईचा , शिंदखेडा ते चिमठाणे पुढे वाडी शेवाडी बॅरेंज पर्यंत पुढे देगाव ते सतारे , होळ ते नरडाणा पुढे बेटावद पर्यंत , शिंदखेडा ते वरपाडे , चिमठाणे ते विखरण पुढे दोंडाईचा ते निमगुळ,  शिंदखेडा ते पाटण पुढे सुकवद पुढे शिरपुर,  शिंदखेडा ते वर्षी पुढे नॅशनल हायवे पर्यंतच्या रस्त्यावर येणारे झाडे झुडपे काढण्यात यावेत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग शिंदखेडा येथिल उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी  यांना निवेदन देऊन केली मागणी. यावेळी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा मा.नगरसेवक सुरज देसले , महेश गुरव , विकास राजपूत , तुषार पाटील , गोपाल निकम , पंकज गिरासे , सचिन शिंदे , नयन बडगुजर , जतीन पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments