नरडाणा:- रा.से.यो.मार्फत नरडाणा महाविद्यालयात फ्रीडम रन व स्वच्छ भारत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.आरोग्य संपन्न व निरामय आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक नागरिकाने व विद्यार्थ्यानी व्यायाम, योगासन, धावण्या सारख्या सवयी दैनंदिन जीवनात अवलंबणे आवश्यक आहेत तसेच प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेचा मार्ग अवलंबिला पाहिजे असे मत प्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील यांनी व्यक्त केले.महाविद्यालयातील रा. से. यो चे विद्यार्थी भरत भील, अविनाश बागले, विनय सिसोदे, प्रशांत पाटील, लीलाधर पाटील व इतर सर्व विद्यार्थी यांनी प्लास्टिक वस्तू,प्लास्टिक पिशव्या उचलून नरडाणा गावात उपक्रमात सहभाग घेतला तसेच या विद्यार्थ्यांनी फ्रीडम रन व फिट इंडिया उपक्रमात सहभाग घेतला. एकूण २० स्वयंसेवकांनी पाच किलो प्लास्टिक च्या वस्तू व प्लास्टिक पिशव्या गोळा केल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी.ज़ी.सोनवणे व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.एस. ढीवरे यांनी परिश्रम घेतले.


0 Comments