Header Ads Widget

*लोहमार्ग व नंदुरबार रेल्वे पोलीस यांच्या कार्यतत्परेतून बात्तर तासातच लावला-दोंडाईचा रेल्वे ट्रँकवरून चोरी झालेला वीस लाख रूपये किंमतीचा बारा टायर ट्रालाचा तपास...*




*नांदगाव-वैजापुर परिसरातुन रस्त्याच्या बाजूला उभ्या बेवारस परिस्थितीतून ट्राला जप्त...*

*नवे टायर बँटरी चोरीला, डिझेल संपल्या कारणाने चोरांचे ट्राला सोडून पलायन...*

*जनमत-*

*दोंडाईचा-* येथे नुकतेच ५ आँक्टोंबर बुधवार रोजी म्हणजे विजयादशमी-दसऱ्याच्या दिवशी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व रेल्वे धक्का मालवाहतुक ठेकेदार श्री  सेवकराम परशुराम जयसिंगानी यांचा एम.एच.१८-बी.ए.-०३६७  हा अशोक लेलँड ३११८ माँडेल कंपनीचा बारा टायर ट्राला दोंडाईचा रेल्वे मालवाहतुक ट्रँकवरून अज्ञात चोरांनी चोरीच्या इराधातुन चोरून नेला होता.मात्र औरगांबाद लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिपक काजवे व नंदुरबार प्रभारी रेल्वे पोलीस निरीक्षक श्री रमेशजी वावरे यांच्या कार्यतत्परेतून बात्तर तासाच्या आत चौकस डिटेक्शन पद्धतीने घटनेचा तपास लावत,नांदगाव,जि.नासिक व वैजापुर जि.औरंगाबाद ह्या दोघी जिल्ह्याच्या हद्दीजवळील कासारे ह्या गावात रोडापासुन काही अंतरावर बेवारस पद्धतीने उभा बारा टायर ट्राला जप्त करण्यात आला आहे. याबाबत ट्राला मालक श्री जयसिंगानी ट्राला मिळाला म्हणुन आनंद व्यक्त करत असुन नंदुरबार रेल्वे पोलीस यांचे आभार व्यक्त करत आहे.

याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की, दोंडाईचा रेल्वे धक्का मालवाहतुक ट्रँकवर दिनांक चार आँक्टोंबर मंगळवार रात्री माल भरण्यासाठी वरील ट्राला लावण्यात आला होता. मात्र ५ आँक्टोंबर बुधवार रोजी सकाळी धक्क्यावर ट्राला मिळून आला नाही. म्हणून जयसिंगानी यांनी गावात इतरत्र तपास करत अनेक ड्रायव्हरांना विचारपूस केली. तीन ते चार तासाचा अवधी उलटल्यानंतर ही ट्राला गावात नसल्यामुळे त्यांनी दोंडाईचा पोलीस स्टेशनात धाव घेतली. यावेळी दोंडाईचा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री दुर्गेशजी तिवारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत, तक्रारदांराना घटना रेल्वे हद्दीत येत असल्यामुळे तुम्हाला रेल्वे पोलीस यांच्या दप्तरी तक्रार नोंद करावी लागेल, असा सल्ला दिला. तसेच आम्हीही घटनेवर लक्ष ठेवून, तपास लागताच आपल्याला माहिती देण्यात  येईल, अशी मदत केली. तदनंतर जयसिंगानी यांनी नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनात म्हणजे जी.आर.पी.पोलीस स्थानकात गुन्हा रजिस्टर केला. यावेळी ड्युटीवर असलेले प्रभारी सहाय्यक निरीक्षक श्री रमेशजी वावरे यानी वरिष्ठांशी चर्चा करून तातडीने घटनास्थळी भेट देत दोंंडाईचा शहरातील मेन रोडावरील सी.सी.टी.व्ही फुटेज खंगाळले.त्यात त्यांना गावातील दोन तीन ठिकाणच्या कँमेरात ट्राला पहाटे शहादा रस्ता उड्डाणपुल मार्ग नंदुरबार चौफुलीहून नंदुरबारकडे जाताना दिसतो.मात्र ट्राला नंदुरबार मध्ये आलेला दिसत नाही. मग त्यांनी पुन्हा दोंडाईचातील सी.सी.टी.व्ही.फुटेज तपासले असता नंदुरबार चौफुलीवरील सचीन हाँटेलच्या कँमेरात ट्राला पुन्हा अर्धा तासाच्या अंतराने नंदुरबार रस्त्याने परत येऊन धुळे रस्त्याकडे जातांना दिसतो.तेव्हा त्यांनी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस विभागाच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची मदत घेत,ट्राला नांदगाव जि. नासिक व वैजापुर जि.औरंगाबाद ह्या दोन जिल्ह्याच्या हद्दीजवळील  कासारे गावात रोडापासुन काही अंतरावर बेवारस परिस्थितीत  मिळून आला. यावेळी चोरांनी डिझेल संपल्याच्या कारणाने ट्राला रस्त्तात सोडून पळ काढलेला होता. मात्र त्याअगोदर  ट्रालाचे बारा नवे टायर, बँटरी,नंबर प्लेट चोरून पोबारा केला होता.पण रेल्वे पोलिसांनी बात्तर तासातच ट्रालाचा शोध लावून मुळ मालकास ट्राला परत मिळवून दिला. म्हणुन जयसिंगानी परिवाराच्या दिवाळीतल्या लक्ष्मीचे पाऊल घरी परत आल्याचा आनंद गगनात मावत नव्हता व यावेळी नंदुरबार रेल्वे पोलीसांचे तोंडभरून कौतुक करत होते. 

सदर वरील कार्यवाही औरंगाबाद लोहमार्ग विभागाच्या पोलीस अधीक्षक मा. मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिपक काजवे,प्रभारी अधिकारी रेल्वे पोलीस स्टेशन नंदुरबार श्री रमेशजी वावरे,पोलीस निरीक्षक त्र्यंबक वाघ,पोलीस हवलदार किरण बोरसे, राजेश घोराडे, प्रकाश गोसावी, जितेंद्र चौधरी आदींनी विशेष मेहनत घेतली आहे.

Post a Comment

0 Comments