औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार अतिक्रमण काढण्यासाठी फौज फाट्यासह कारवाई करण्यात आली. सर्वच पस्तीस रहिवासी घरे सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत काम करत जमीनदोस्त करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शहरात विरदेल रोड उजव्या बाजूला असलेल्या अतिक्रमीत पस्तीस रहिवासी जागेवर अतिक्रमण काढावे असा आदेश औरंगाबाद हायकोर्टाने दिला होता. त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संबंधित रहिवासी यांना नोटिसा बजावल्या होत्या. अखेर आज न्यायालयाच्या तारखेनुसार शेवटच्या दिवशी सदरची कारवाई करण्यात आली. सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत तीन जेसीबी मशीन च्या साह्याने अतिक्रमीत पस्तीस रहिवासी घरे जमीनदोस्त करण्यात आली.सदर औरंगाबाद हायकोर्टात जमिनिचे मालक दिपक सुधाकर देसले व संजय रतनलाल शहा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महा.राज्य. मार्ग क्रं -6 च्या बाजुस असलेल्या अतिक्रमण काढणे विषयी दावा दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन 20-10-22 अखेर अतिक्रमण काढण्याचे आदेश संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले होते.त्यानुसार औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सुर्यवंशी, शाखा अभियंता पंकज भामरे, चेतन देवरे, अमोल पाटील व सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. ह्यावेळी बंदोबस्त शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या नेतृत्वाखाली विरदेल रोड अतिक्रमण जागेवर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गोरावडे, रवींद्र केदार, मिलिंद पवार यांच्या सह पंचवीस महिला कर्मचारी व पोलीस कर्मचारी व धुळे येथील कंमाडो यांचा फौज फाटा तैनात होता . ह्यासाठी महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता बोरसे यांसह कर्मचारी यांनी सहकार्य केले. अतिक्रमण काढत असताना खरोखर गरीब रहिवासी महिला लाभार्थी चे अश्रू अनावर झाले होते. अशी कारवाई शिंदखेडा शहरात वीस वर्षांनंतर येवढी मोठी कारवाई झाली आहे.
0 Comments