शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी - येथील एस.एस.व्हि.पी.एस. महाविद्यालयात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत , विद्यार्थी आपल्या कल्पकतेतून नव नवीन शोधकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्या शोधकतेला वाव मिळण्यासाठी हे
अविष्कार स्पर्धेचे माध्यम आहे.शहरातील नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा नवीन शोधाची निर्मिती करत असतात. विशेष म्हणजे 2012 च्या अविष्कार स्पर्धेत अंध व्यक्तींसाठी उपयुक्त तयार केलेली काठी राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारी हेच महाविद्यालय होते.असे प्रतिपादन माजी
सदस्य विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे दिलीप रामू पाटील यांनी केले.ते एसएसव्हीपीएस महाविद्यालय शिंदखेड़ा येथे कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुल्लकुमार सिसोदे होते. सुरुवातीला वृक्षांना जलपुनर्भरण मान्यवरांनी केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार पाटील यांनी केले. त्यात विद्यापीठ अतंर्गत जळगाव,धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात आज आविष्कार स्पर्धांचे आयोजन केले आहे.धुळे जिल्ह्यातील मान शिंदखेडा महाविद्यालयास मिळाला. महाविद्यालयात शिक्षणासोबतच विविध बौद्धिक विचारमंथन साठी व्याख्यानमाला सतत राबविण्यात येतात. सर्व गुणांना वाव मिळावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापन समिती, पदाधिकारी, प्राध्यापक वर्गाचे अनमोल सहकार्य मिळत असते. सुमारे साडेपाच एकर क्षेत्रावर ही महाविद्यालयाची निर्मिती असलेल्या भव्य दिव्य ज्ञान मंदिरात शिंदखेडा येथील निखिल राखेचा छत्तीसगड येथे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत ते हयाच महाविद्यालयाचे विद्यार्थी शिवाय नऊ विद्यार्थी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, नामवंत डॉक्टर, प्राध्यापक ह्या महाविद्यालयातुन घडुन गेल्याचा उल्लेख त्यांनी ह्यावेळी केला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता मानव्य विद्या शाखा डॉ. प्रमोद पवार, विद्यापीठ निरीक्षक प्रा. रमेश सरदार ,
स्थानिक कार्यकारिणी उपाध्यक्ष अशोक बापू पाटील, संचालक प्रा. सुरेश देसले, पोलीस उप निरीक्षक प्रशांत गोरावडे ,मिलिंद पवार, सीनेट सदस्य अमोल मराठे, उप प्राचार्य डॉ. एस. व्ही. बोरसे, डॉ. विशाल पवार, प्रा. ए. टी. राउळ समन्वयक डॉ.एन.एस.पवार उप समन्वयक डॉ. एस. के जाधव आदि उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. प्रमोद पवार व निरीक्षक प्रा. रमेश सरदार यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात स्थानिक कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे म्हणाले आविष्कार स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी शोधक बनण्यासाठी वाव मिळतो. शहरी भागांसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शोधक वृत्ती अधिक असते. शेतीपूरक कल्पता शोधून नव्या निर्मितीची जबाबदारी पार पाडत असतो. दुसऱ्या सत्रात आविष्कार स्पर्धेच्या दालनाचे उद्घाटन विद्यापीठ माजी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप दामु पाटील यांनी केले. विविध मांडणी केलेल्या उपकरण व पोष्टरची पाहणी मान्यवरांनी करून समाधान व्यक्त केले.
या स्पर्धेत धुळे जिल्ह्यातून सर्वात जास्त 792 उपकरणाची नोंद झाली होती. त्यातून 29 महाविद्यालयातून 473 उपकरणे वैध झाले. 43 मॉडेल व 430 पोस्टर सादरीकरण झाले. स्पर्धा पदवी, पदव्युत्तर, संशोधक विद्यार्थी व शिक्षक अशा चार विभागात झाली. विद्यार्थी आपल्या संशोधनाचा विषय मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेत सादर केले.
या स्पर्धेत सहा गट तयार करण्यात आले आहेत.त्यात पहिल्या गटात सामाजिकशास्त्रे, भाषा, मानव्यविद्या, ललित कला, दुसर्या गटात वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, तिसर्या गटात विज्ञान शाखा, त्यात भौतिक शास्त्र, जीवन शास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, गृह आणि संगणकशास्त्र आहेत. चौथ्या गटात कृषी व पशुसंवर्धन, पाचव्या गटात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सहाव्या गटात औषधनिर्माण शास्त्र यांचा समावेश आहे.सदर उपकरणांची परीक्षण करून विद्यापीठा मार्फत निकाल घोषीत केले जातील. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. तुषार पाटील, उप प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व एनसीसी चे विद्यार्थी यांनी परिश्रम घेत 18 उप समित्या याशिवाय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मदत संपर्क कक्षदेखील स्थापन करण्यात आला होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आशा कांबळे व प्रा. स्वप्निल गांगुर्डे यांनी तर समन्वयक डॉ.एन. एस. पवार यांनी आभार मानले.



0 Comments