Header Ads Widget

*मानव मित्र तथा सहकार महर्षी कांतीलालजी जैन यांना 76 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*




    
      मानव मित्र कांतीलालजी जैन यांच्या 76 व्या जयंती निमित्त अनेक आठवणींना उजाळा झाला.   खान्देशातील नावाजलेले व्यक्तिमत्व मानव मित्र तथा सहकार महर्षी आणि संकट मोचन म्हणून ओळखले जाणारे काकाजी कांतीलालजी हस्तीमलजी जैन हे जरी आज आपल्यामध्ये शरीराने नसले तरी त्यांचे आचार विचार आणि कृती आज देखील तन, मन आणि विचारात संचारत आहे. *"जे आवडे सर्वांना, तेच आवडे देवाला*" अशा म्हणीप्रमाणे आमच्यातील करता करिता धनी,  समाज प्रबोधन करीत अन्याय, अत्याचार विरुद्ध लढण्यासाठी बळ देणारी, प्रेरणा देणारे मानव मित्र, क्रांतिकारी विचाराचे कांतीलालजी जैन यांच्या 76 व्या जयंती निमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर त्यांच्या आचरण आणि विचारांना कृतीत आणणे नितांत गरजेचे आहे. कांतीलालजी काका यांनी अनेक गरजवंतांना,व्यवसायिकांना, शेतकऱ्यांना कधी बँकेच्या माध्यमातून तर कधी वैयक्तिकरित्या मदत करून दातृत्वाची भावना प्रकट केली आहे. गरजवंतांना मदत करणे हा त्यांच्या स्थायीभाव आणि गरजवंतांच्या दाराशी, टपरी पाशी, झोपडीपाशी जाऊन काका जीना मदत करताना आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. असा दानवीर ,कर्मवीर, सहकार महर्षी, मानव मित्र काकाश्री कांतीलालजी जैन हे आज आपल्यात शरीराने जरी नसले तरी त्यांचे काम, आचार, विचार अनेकांच्या मनात धगधगत आहेत.

     काकाश्री कांतीलालजी जैन यांना हुकूमशाही, अत्याचार, दहशत आणि जुलमी राजवट विषयी चीड होती.काकाश्री सामान्य तरुणांच्या पाठीशी उभे राहून अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढा देण्याचे काम ते नियमित करत आले आहेत.. परिणामाची चिंता न करता अनेक संकटांना त्यांनी तोंड दिले आहे आणि चुकीच्या काम, गोष्टीविरुद्ध त्यांनी लढा उभा केला आहे. असे प्रखर व्यक्तिमत्व आज आमच्यात नाही त्यामुळे माझ्यासारख्या अनेक संघर्ष शाली व्यक्तींना त्यांची आठवण आवर्जून येत असते, जणू काही आपल्या शरीराचा एक भागच गळून पडला आहे, विकलांग झाला आहे अशा पद्धतीची भावना क्रांतिकारी आणि स्वतंत्र विचाराच्या व्यक्तींना येणे स्वाभाविक  आहे. काकाजी मदत करताना कोणतीही अपेक्षा न ठेवता चुकीच्या कामांना विरोध करून, अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्यांना  त्यांनी कायम बळ दिले आहे. काकाजींच्या कामाची शब्दात रचना करणे अवघड असले तरी त्याच्या सहकार्याने असंख्य नेतृत्व, कर्तृत्व आणि उभे राहिलेले तरुण, व्यापारी आणि शेतकरी त्यांना आमरण विसरू शकत नाहीत. मनुष्यातील चांगले गुण ओळखून त्यांना आपलेसे करणे हा त्यांच्या स्थायी स्वभाव,  मित्र गोळा करणे हा छंद त्यामुळे ते खानदेशात मानव मित्र म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी कर्तुत्ववान व्यक्ती आज आमच्यात नसल्याने आमचे अनेक विचार गळून पडले आहेत ही सत्यता नाकारून चालणार नाही.                                     

     हस्ती बँकेचा कारभार, विस्तार वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा त्यांच्या पाउलावर पाऊल ठेवून त्यांचे सहकारी मित्र बँकेचे संचालक व त्यांचे लहान पुत्र कैलासजी जैन आणि पुतणे किशोरजी जैन यांनी ही धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. आणि या सर्वांना हाताशी धरून परिवार एक संघ ठेवण्याचे काम मदनलालजी जैन हे यशस्वीपणे करीत आहेत. कांतीलाल जी जैन आणि शांतीलाल जी जैन हे दोन भाऊ या दोन्ही भावांची पाच मुलं परंतु परिवार एक संघ असल्याने मदनलाल, किशोर, अशोक , कैलास, आणि प्रदीप हे कोणाचे पुत्र कांतीलालजी की शांतीलालजी हा अनेकांना प्रश्न पडतो. अनेक पत्रकार आमच्यासारख्या निकटवर्तीयां कडून ही माहिती घेत असतात त्यावेळी कळते की हा परिवार किती एकसंघ आहे.पाचही मुलांना बापाचेच प्रेम पापाजी शांतीलालजी जैन आणि काकाजी कांतीलालजी जैन यांनी दिले हा बोध प्रत्येक परिवाराने घेण्यासारखा आहे.

      हस्ती बँकेची वाटचाल आणि हस्ती स्कूलचे कारभार पाहण्याची जबाबदारी कैलास जैन यांनी यशस्वी पणे स्वीकारली आणि अहोरात्र  मेहनत करून आणि चिकाटीने काकाजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार आणि शिक्षण या दोन्हीं क्षेत्रात वाटचाल जोमात सुरू आहे. त्याच प्रमाणे अशोक भाऊ यांनी धार्मिक, सामाजिक, आणि वैद्यकीय सेवा त्यासोबत भाजी भाकर केंद्राची यशस्वी धुरा सांभाळली, तर मदनलालजी आणि किशोर भाऊ यांनी व्यवसायिक सोबत सामाजिक बांधिलकी ठेवून समन्वयाच्या भूमिकेत यशस्वी कामकाज केले. कैलास भाऊ आणि अशोक भाऊ  यांच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, बँकिंग कार्यात भरपूर मदत करीत असतात. अशा पद्धतीने कांतीलालजी जैन यांनी दिलेले धडे यशस्वीपणे त्यांचे परिवार राबवित असल्याने कांतीलालजी काका हे प्रत्येकाच्या मनात आज देखील अजरामर आहेत. कांतीलालजी काकांच्या 76  व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

     राकेश प्रल्हाद पाटील
      मा.नगरसेवक
         

Post a Comment

0 Comments