Header Ads Widget

'आज की ताजा खबर' पुरविणाऱ्या अख्तर पठाण यांचा भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त हृद सत्कार

 


धुळे- कडाक्याची थंडी, ऊन, वारा, पाऊस, वादळ याची तमा न बाळगता भल्या पहाटेच वृत्तपत्राचे वितरण करून ‘आज की ताजा खबर’ सोबतच वाचन संस्कृती रुजविण्यात मदत करणाऱ्या तमात वृत्तपत्र विक्रेत्यांना आजच्या भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी शुभेच्छा दिल्या असुन परिषदेच्या आवाहनानुसार धुळे येथील साक्री रोडवरील अपंग वृत्तपत्र विक्रेता अख्तर उस्मान पठाण जो आझादनगर परिसरातून रोज पाच किलोमीटर तीन चाकी सायकलीवर भल्या पहाटे येऊन गेल्या 25 वर्षापासून वाचकांची वाचनाची भूक भागवितो.  अख्तर पठाण यांचे बंधु महेबुब उस्मान पठाण हे सुद्धा वृत्त पत्र विक्रेते असून वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे ते सचिव आहेत.

सर्व वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांच्या कृतज्ञता प्रती प्रातिनिधिक स्वरुपात अख्तर पठाण यांचा आज शाल, श्रीफळ, हार, देऊन पेढा भरवून साक्री रोड परिसरातील वाचक वर्गातर्फे सत्कार करण्यात आला. त्यात सर्वश्री अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे, सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री प्रकाश आप्पा मोरे, बापूजी अहिरे, मोतीशेट तोलाणी, प्रमोद ढवळे, गजुभाऊ कासारे, मोहन प्यारे परदेशी, देविदास सोनवणे, दत्तु विधाते, रतन देवरे  आदींचा समावेश होता. भारतरत्न, मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जयंती दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 

 

Post a Comment

0 Comments