शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस व जागतिक हात धुवून दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेत.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम होते व प्रमुख पाहुणे- मा.श्री.पी.आर.पाटील यांच्यासह डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नंतर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकेत्तर आवडीचे पुस्तक वाचन करण्याची मुभा देण्यात आली;या नंतर 'जागतिक हात धुवा'बाबत कृतिशील विद्यार्थ्यांना हॅण्डवाश/साबण लावून हात धुण्याबाबत कृतीयुक्त गीताच्या माध्यमातून कृतिशील प्रात्यक्षिक मा.मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थी मित्र-मैत्रीण या सर्वांनी कृतिशील हातधुण्याचे व हात कोरडे कसे करावे इ.प्रात्यक्षिक केले.
तद्नंतर शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.एस.ऐ.कदम यांनी डाॅ.बाबासाहेबआंबेडकर,महात्माफुले,डाॅ.अब्दुल कलाम,डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णण,सरोजिनीनायडू,वि.दा.करंदीकर,सानेगुरूजी,संत ज्ञानेश्वर,संत कबीर,इ.व्यक्तींचे दाखले देवून कार्यकुशलता विषयी व 'जागतिक हात धुवा दिन' स्वच्छता बाबत संत गाडगेबाबा, संत बसवेश्वर महाराज-"जगणे सुंदर होऊ शकत"!या बसश्वेरांच्या ओळींचे खंडण-मंडण करून महत्त्व पटवून दिले.यावेळी कार्यक्रमास-मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद,विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.
यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- श्री.एस.बी.भदाणे यांनी केले.तर
आभार-एस.एस.पाटील यांनी मानले.


0 Comments