शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-- शिंदखेडा येथील खुशी कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षीपासून गोरगरिबांना दिलासा मिळावा, फुटपाथवर जीवन
जगणाऱ्या लहान लहान मुलांची देखील दिवाळी गोड साजरी हया भावनेने उपक्रम हाती घेतला असून या वर्षीही कोर्टच्या समोर वस्तीतील जे गरजू व्यक्तींचे कुटुंब जीवन जगत आहेत अशांना सदरच्या क्लासेस च्या सर्व विद्यार्थ्यांनी ठरवलं की या दिवाळीला आपण गरजू व्यक्तींसोबत दिवाळी साजरा करू म्हणून दिवाळीनिमित्त क्लासेस चे संचालक मयुरेश अग्रवाल सर, वर्षा अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज गोविंदा अग्रवाल, आरव जैन ,अर्णव जैन , तेजस गिरासे ,यश पाटील ,कुमुद चौधरी, दीप लोहार ,पवित्रा पवार, मनस्वी चौधरी, मितल बागुल ,पूर्वा वाघ, उमंग पाटील ,मनीष चौधरी ,यशस्विनी परमार ,दीक्षित चौधरी, लोकेश शेंगदाणे, मानव पवार ,अब्रार खान पठाण , हर्षदीप चौधरी ,ललित चौधरी आणि हर्षदा चौधरी यांनी दिवाळी
फराळ, रांगोळी, दिवे आणि तांदूळ हे साहित्य भेट म्हणून दिले. खुशी क्लासेस दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवित असतात. विद्यार्जन बरोबर सामाजिक बांधिलकी जपत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना संचालक मयुरेश अग्रवाल व वर्षा अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभत असते. ह्या अनपेक्षित उपक्रमाचे शिंदखेडा शहरातुन विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
0 Comments