वर्दीत एक प्रेमळ संवेदनशील दडलेला असतो. त्यातून शिंदखेडा येथील पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांनी दिवाळी निमित्त येथील दिव्यांग मुलांना शहराची सफर घडवून त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली. तसेच दिवाळी निमित्ताने बाहेरगावी जात असलेल्या नागरिकांना घराची काळजी घेण्यासाठी आवाहन केले आहे. शिंदखेडा येथील एका सेवाभावी संस्थेत जवळपास पंधरा दिव्यांग मुलं मुली आहेत. त्यात जन्मतः चे कुणाला पाय नाही, कुणाला हात नाही. त्यात चालणेही दुरच अशा विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या गाडीत बसून शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, आशापुरी देवी देवस्थान ह्यासह विविध स्थळी सफर केली.त्यानतर मिठाई व कपडे खरेदी करून त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली.हा दिव्यांग मुलांना दिवाळीची पर्वणी ठरली आहे म्हणून त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. शिंदखेडा येथील पोलिस निरीक्षक सुनील भाबड व उपनिरीक्षक प्रशांत गोरावडे सह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.त्यांच्या ह्या विशेष योगदानाबद्दल शहरात नव्हे तर तालुक्यात कौतुक होत आहे. त्याचबरोबर दिवाळी साजरी होत असताना अनेक कुटुंबे सुट्टीत बाहेरगावी किंवा आपल्या घरी जायचं असते म्हणून काही खबरदारी घ्यावी लागेल त्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू सोबत न्यायला विसरू नका शक्य नसल्यास ओळखीच्या व्यक्ती कडे देऊन जा. घरातील चोहीकडे लाईट सुरूच ठेवावेत आणि शेजारच्या घराकडे मेसेज द्या सुरक्षा द्रुष्टीने आपली काळजी आपण घ्या. कारण बंद घर हे चोरांचे माहेरघर असते. कोराणा महामारी नंतर ही पहिलीच दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना प्रवासात देखील सावधानता बाळगावी असे आवाहन शिंदखेडा पोलिस निरीक्षक सुनील भाबड यावेळी केले.
0 Comments