Header Ads Widget

*शिंदखेडा येथील पोलिस निरीक्षक सुनील भाबड साहेबांची सदिच्छा भेट*



  शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी  -                  येथील पोलिस ठाण्यात आज केदारेश्वर मंदीर कालनी परिसरातील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते दिपक बाविस्कर यांनी सदिच्छा भेट घेऊन दिवाळी च्या शुभेच्छा देत नुकतीच शहरातील एका सेवाभावी संस्थेतील दिव्यांग पंधरा मुलांना शहरातील विविध स्थळी सफर पोलीस व्हॅन मध्ये केली. शिवाय दुकानात घेऊन मुलांच्या मनपसंत कपडे खरेदी करून मिठाई देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. हे पोलीस खाकीत एक माणुसकीचा धर्म पाडला. असे अधिकारी क्वचित मिळतात पण आठवणी मात्र कायम असतात. म्हणून अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदत देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका असते. ह्यावेळी सदिच्छा भेट सामाजिक कार्यकर्ते दिपक बाविस्कर व मित्र परिवारातर्फे देऊन धन्यवाद व्यक्त करुन दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या.तसेच आज दिपक बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस निरीक्षक सुनील भाबड व पोलीस स्टेशन च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी पोलिस सहायक उपनिरीक्षक मिलिंद पवार, रवींद्र केदार सह पोलीस कर्मचारी , पत्रकार यादवराव सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments