कंचनपुर-दिल से फाऊंडेशन तर्फे आयोजित कंचनपुर प्रीमियर लीग सिजन-3 (KPL-3) मधे कंचनपुर लिजेंट्स(टीम-D) विजयी झाली. दिल से फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील सर व स्पर्धेचे आयोजक वैभव पवार व सागर पवार यांच्या हस्ते विजयी संघाला ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन गौरविन्यात आले. तसेच दिल से फाउंडेशनचे सहकारी मित्र लहु बागुल,मनोहर बोरसे,लष्मीकांत पवार,योगेश सोनवणे,अनिल सालुंखे ,योगेश बागुल,हर्षल भदाने व सर्व तरुण मित्र मंडळ कंचनपुर यांनी मोलाचे सहकार्य केले. अशा विविध स्पर्धांचे आयोजन वेळोवेळी दिल से फाउंडेशनच्या वतीने करण्यात येते ज्याच्यामुळे तरुणांचे मनोबल व आत्मविश्वास वाढतो असे मत दिल से फाउंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील सर यांनी व्यक्त केले.
0 Comments