Header Ads Widget

*शिंदखेडा येथील स्व. नवनीतलाल भूकनदास शहा यांचे निधन उद्या अंत्ययात्रा*



शिंदखेडा (प्रतिनिधी )---
      स्व. नवनीतलाल भूकनदास शहा यांचे 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने आज दिनांक 17 ऑक्टोम्बर रोजी निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दिनांक 18 रोजी सकाळी निघणार आहे. 
      नवनीतलाल शहा यांचे जीवन अतिशय कष्टाळू तसे ते समाजवादी विचारसरणीचे एवढेच काय शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते तथा वाडी शेवाडे प्रकल्पाचे जनक माजी आमदार स्व. ठाणसिंग जीभाऊंचे कट्टर समर्थक म्हणून परिचित रोज रात्री जेवणानंतर त्यांचे एक सहकारी मित्र शंकर सूर्यवंशी यांचे व भाईंचे जवळचे मित्र ही जोडी त्या काळात मैत्रीच्या बाबतीत प्रसिद्ध होते नवनीत भाईंनी त्यांचे नाव साईबाबा ठेवले व ते त्याच नावाने उल्लेख करीत असत गावात काय घडामोडी झाल्यात याची सर्व माहिती रोज संध्याकाळी ठाणसिंग जीभाऊंपर्यत पोहोचवण्याचे काम ही जोडी करीत असे 
     समाजवादी विचारसरणीमुळे सन 1975-76 च्या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली सर्वत्र धरपकड सुरू झाली ठाणसिंग जीभाऊंनाही अटक झाली सोबत नवनीतलाल शहा यांनाही तुरुंगात टाकण्यात आले सुमारे पंधरा महिने नाशिकच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली होती .
       परिवारात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार सध्या दैनिक पुण्यनगरीचे  परेश शहा चे वडील होते. 
नवनीत भाईंच्या पश्चात वरील परिवारासह सून ,जावई असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments