---------------------------
*अजित सीडस् च्या प्रात्याक्षिक शेतकरी मेळाव्यात उद्गगार*
---------------------------
*धुळे - सुलवाडे जामफळ धरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून ते काम लवकरच पुर्णत्वास येणार आहे. अक्कलपाडा धरणाच्या पाण्याच्या साठा क्षमतेपेक्षा साडेतीन पटीने या धरणाची मोठी क्षमता आहे. ते पाणी कॅनाॅलद्वारे जेव्हा वेल्हाणे -बाबरे गांवापर्यंत पोहचेल तेव्हा शिरूड परिसरातील शेतीचा मोठा कायापालट होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत. या कामासाठी मी केलेला पाठपुरावा व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या योजनेकरीता पंतप्रधान मोदी साहेबांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या राखीव निधी २५oo कोटी रूपयांचा निधी दिल्यामुळेच हे काम करू शकलो... असे उदगार धुळे लोकसभेचे खासदार तथा मा.केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष बाबा भामरे यांनी काल शिरूड येथे काढले. शिरूड येथील प्रगतीशील शेतकरी श्री.नंदलाल पुनमचंद शर्मा यांना खासदारांच्या शुभहस्ते शिव-प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले. नंदलाल शर्मा यांच्या शेतात अजित सीडस् कंपनीच्या पिक प्रात्याक्षिक व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.* ते पुढे म्हणाले की, सुलवाडे जामफळ होत असलेला संपूर्ण प्रकल्प प्रत्यक्ष बघण्यासाठी मी लवकरच सर्व शेतकऱ्यांना धरणाच्या साईट नेऊन दाखवणार आहे. प्रत्यक्ष प्रकल्प बघाल तेव्हा जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण व त्याची व्याप्ती शेतकऱ्यांना कळेल, असे सांगून त्यांनी खासदारकीच्या संपूर्ण कार्यकाळात केलेल्या अनेकविध योजनांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. या शेतकरी मेळाव्याला धुळे तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे खान्देश विभागाचे अधिकारी श्री.सुनील मुळे यांनी शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी पिक व्यवस्थापना संदर्भात यथोचित मार्गदर्शन केले. तसेच भाजपाचे प्रवक्ते संजय शर्मा, धुळे जि.प.चे कृषि सभापती श्री.संग्राम पाटील, भाजपाचे उपाध्यक्ष प्रा.अरविंद जाधव यांचे मनोगत झाले. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते श्री.संजय शर्मा यांनी शेतकऱ्यांना अतिशय मौलिक मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना सतत येणाऱ्या अडी-अडीचणी सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे भाजपचे नेते संजय शर्मा यांच्या आग्रही निमंत्रणामुळे खा.डॉ.सुभाष भामरे साहेब हे दिल्लीत अतिशय व्यस्त असतांनाही ते पहाटे सहा वाजेच्या विमानाने नाशिकला आलेत. तेथून थेट शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी आल्याने शेतकऱ्यांना प्रचंड आनंद झाला.विचार मंचावर खा.सुभाष भामरे सह मराठा क्रांती मोर्चाचे सचीव निंबानाना मराठे, भाजपाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिरूडचे मा.सरपंच विजय पाटील, पं.स. उपसभापती विद्याधर पाटील, अनिल जयस्वाल बोरविहिरचे पोलीस पाटील वाल्मिक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात कृषि मेळाव्याचे आयोजक प्रगतीशील शेतकरी श्री.नंदलाल शर्मा यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा खासदार साहेबांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मेळाव्यास शिरूडचे ग्रा.पं. सदस्य सुरेश कोढे, दिनेश गायकवाड, मोहन शिंदे, नारायण पाटील, रघुनाथ हुजरे, नाना शिंदे, विजय अंतोष शिंदे, संजय शिंदे, बापु गढरी, हिरालाल धनगर प्रविण धनगर, वेल्हाण्याचे उपसरपंच चुडामण अण्णा सुर्यवंशी, मा.सरपंच अण्णा भाऊ मराठे, भिकनदादा मराठे, नंदलाल पाटील, धामणगाव सरपंच विजय बंडू पाटील, शरद पाटील, रविंद्र पाटील, महादू पाटील, प्रितम पाटील, छोटू पाटील (नंदाळे,) अरूण पाटील जगदिश पाटील (विंचूर), बंन्शीलाल पाटील (तरवाडे) मुलचंद पवार नवल पवार संतोष पवार,बळीराम चव्हाण (मोरदड तांडा ) दिनेश पावरा, आदींसह नेर, कुसुंबा,सोनगीर, कापडणे, बोरकुंड, फागणे, मुकटी परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


0 Comments