Header Ads Widget

*प्राचार्या श्रीमती मनिषा देसले यांची खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती.*




*वृत्त प्रतिनिधी-: धनंजय गाळणकर*
*धुळे दि.१६ ऑक्टोबर - संपुर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या नोंदणीकृत खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या राजाध्यक्ष श्री.भरत रसाळे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्हा अध्यक्षपदी मिरच्या मारुती मराठा पंच मंडळ प्राथमिक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मनिषा काशिनाथ देसले यांची संस्थेच्या जिल्हाध्यक्ष पदी दोन वर्षांसाठी निवड झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील समस्यांच्या निराकरणासह संघटना विस्तारासह संघटना मजबूतीसाठी योगदान देण्याची अपेक्षा याप्रसंगी राजाध्यक्ष श्री.भरत रसाळे यांनी व्यक्त केली आहे. श्रीमती मनिषा देसले यांच्या निवडी बद्दल मिरच्या मारुती मराठा पंच मंडळ प्राथमिक विद्यालय संस्थेचे संचालक श्री.नानासाहेब भानुदासजी बगदे,प्रमोदआण्णा साळूंके,संजयजी बगदे,शामभाऊ रायगुडे,विकासभाऊ बाबर,महेंद्र रगडे,शेषराज जाधव,किरण मराठे,किशोर सुडके,गजानन गायकवाड,विनायक सरोदे,दिनेश काळे,आप्पासाहेब अनिलजी बगदे,विवेक उर्फ बबलू बागुल,अनिल जगताप,गिरीषभाऊ चव्हान,भारत कदम,सुनिलभाऊ यादव,गोविंद वाघ,नारायण भालशिंगे,सुरेश काळे,मुकुंद शिंदे,बाळासाहेब ठोंबरे,शरद मराठे,धनंजय गाळणकर आदींनी प्राचार्या श्रीमती मनिषा देसले यांचे अभिनंदन केले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.*

Post a Comment

0 Comments