Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी ता.शिंदखेडा जि.धुळे या विद्यालयात नुकताच 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा



         शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी ता.शिंदखेडा जि.धुळे या विद्यालयात नुकताच 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
           या प्रसंगी विद्यालयाचे आदरणीय,मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम यांनी दूरदृश्य प्रणालीतून व श्री पी आर पाटील श्री एस एस पाटील यांनी  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन केले.व प्रस्ताविकेचे वाचन श्री जे डी चव्हाण यांच्या हस्ते  करण्यात आले तर भारतीय संविधान  उद्देशिका मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषेतून श्री आर बी गवळे  यांनी सामुदायिक वाचन करण्यात आले  व  संविधान जनजागृती पर संविधान यात्रेचे आयोजन पोस्टर प्रदर्शनात करण्यात आली तसेच संविधान जनजागृती व्हावी यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले; याप्रसंगी विद्यालयाचे  शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.
       सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -  श्री.सी.जी.वारूडे यांनी केले.व कार्यक्रमाच्या शेवटी 26/11शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली-*.

Post a Comment

0 Comments