शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयातील १७वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुकास्तरीय शालेय खो - खो क्रीडा स्पर्धेत नुकतेच यश संपादन केले.
सविस्तर वृत्त असे की,शिंदखेडा तालुकास्तरीय शालेय खो - खो क्रीडा स्पर्धा दिनांक 24,25/11/2022 पर्यंत नुकत्याच विकास विद्यालय नरडाणा येथे संपन्न झाल्या.
त्यात १७ वर्षाखालील मुलींच्या गटाने दिनांक २५/११/२०२२वार रोजी तालुकास्तरीय खो -खो क्रीडा स्पर्धेत अगस्तमुनी माध्य.विद्या कलमाडी × सानेगुरूजी माध्य.विद्या.पाष्टे,पाष्टे या संघाला पराभूत करून कलमाडी येथील १७वर्षाखालील मुलींच्या संघाने विजय संपादन केले. व या अनुषंगाने या क्रीडा खो खो स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष नरडाणा विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक श्री.कोतकरसर व प्रमुख पाहुणे- उदघाटन नरडाणा संस्थेचे सचिव मा.भाऊसो.सुजितराजे,शिंदखेडा तालुका क्रीडा विस्तार अधिकारी मा.ताईसो.सौ.रेखाजी मॅडम व तालुक्यातील क्रीडाशिक्षक डाॅ.श्री.आनंदपवार,ए.बी.खांडेकर(सेवानिवृत्त),एस.एस.भदाणे,जी.जी.भामरे(गोराणे)निकम सर(दोंडाईचा), विलासपाटील(पाष्टे),पठाणसर,जंमदाळेसर(वाशिम)बेटावद व बाभळे येथील मुख्याध्यापक मा.श्री भटूजी व राजे सर,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद,व नरडाणा विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद,पंच मंडळी तसेच कलमाडी येथील संघ व्यवस्थापक श्री.सी.जी.वारूडे व जे.डी.चव्हाण आदिंचे मार्गदर्शन लाभले तसेच विजयी संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आले.

0 Comments