प्रतिनिधी । शिंदखेडा : शिंदखेडा येथील लालचंद नगर च्या ग स बँक जवळ वरूळ येथील पंकज भटू पाटील यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्र एम एच १८-ए यु ५०६३ हे ट्रॅक्टर ड्रॅयव्हर प्रीतम जयसिंग गिरासे चालवत होता. शिरपूर तालुक्यातील जातोडे, वनावल येथून मकी -कडबा घेऊन संध्याकाळी ६:१५ वाजता ग स बँकेजवळ येऊन पोहोचले. परंतु त्या रोड साईडला असलेले म वि वि मंडळाचे पोलच्या इलेक्ट्रिक ताराच्या शॉर्ट सर्किटमुळे ट्रॅक्टर च्या ट्रॉलीवरील मकी कडब्यावर ठिणग्या पडल्या व कोरड्या चाऱ्याने क्षणार्धात पेट घेतला. ट्रॅक्टर मधील संपुर्ण चारा जळून खाक झाला आहे. अशा परिस्थितीत ही ट्रॅक्टर ट्रॉली पासून वेगळे करण्यात यश आले अन्यथा मोठा अनर्थ होऊन शेतकऱ्यांस प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते.जनावरांना भविष्यात चाऱ्याची वाणवा भासू नये म्हणून पंकज पाटील यांनी चारा आणला होता. शिंदखेडा येथील नगर पंचायत च्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. परंतु ती मदत ही तोकडी पडली. अजून मदत मिळाली नाही तर ट्रॉलीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे असे शेतकऱ्याने झालेल्या संपर्क भ्रमणध्वनी द्वारे सांगितले आणि साधारण चाऱ्याचे ३० ते ३५ हजारापर्यंत नुकसान झालेले आहे. या नुकसानीला जबाबदार कोण ? झालेली नुकसानीचे भरपाई महाराष्ट्र वीज वितरण मंडळ करून देईल काय ? असा प्रश्न जमा झालेल्या शेतकऱ्यांतुन केला जात होता.
0 Comments