Header Ads Widget

*दिव्यांगांसाठी स्वातंत्र्य मंत्रालयाची घोषणा* *शिंदखेडा शहरात दिव्यांग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाडू वाटप करत फटाके फोडून जल्लोषात दिव्यांग मंत्रालय घोषणेचे स्वागत*



(शिंदखेडा यादवराव सावंत प्रतिनिधी)--            राज्यामध्ये दिव्यांगांसाठी स्वातंत्र्य मंत्रालयाची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले आहे. येत्या ३ डिसेंबरला स्वातंत्र्य मंत्रालयाची स्थापना होणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पहिले दिव्यांग मंत्रालय स्थापन होत असून या मागणी करिता मागील २५ वर्षापासून माननीय श्री.आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या प्रयत्नांना अखेरीस  यश आले.
राज्य सरकारच्या निर्णयावर माननीय श्री बच्चुभाऊ कडू म्हणाले की, गेल्या बुधवारी या विषयासंबंधीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या मागील २५ वर्षा पासून लढा देत होते. त्या लढ्याला माननीय श्री बच्चू भाऊ यांना मोठे यश आले असून येत्या तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवसाला स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालय स्थापन होईल
    दिव्यांगाना शासकीय योजनेचा लाभ त्वरित मिळण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग भवन त्याचबरोबर दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद,नगरपंचायत, तसेच ग्रामपंचायत सह स्थानिक आमदार यांच्या अर्थसहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन बांधण्यात येणार आहे.
बैठकीनंतर माननीय आमदार श्री. बच्चुभाऊ कडू यांनी सदर घोषणा झाल्यानंतर मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लाडू वाटून जल्लोष साजरा केला. आणी मुख्यमंत्र्यांचे निर्णयाचे स्वागत केले.
आणि सर्व प्रहार कार्यकर्त्यांना आपापल्या भागात दि.१२ तारखेला लाडू वाटून ढोल ताशे वाजवून जल्लोष साजरा करण्याची मागणीला प्रहार सैनिक म्हणून आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचे परीने त्या मागणीचा  आदर राखत शिंदखेडा शहरातील प्रहार दिव्यांग आंदोलन पुरस्कृत दिव्यांग कृती समिती शिंदखेडा येथील कार्यकर्त्यांनी शिंदखेडा विरदेल चौफुली येथे दिव्यांग कार्यकर्त्यांनी लाडू वाटत व फटाके फोडून दिव्यांग मंत्रालयाचा घोषणेचा उत्सव साजरा केला. यावेळी अध्यक्ष श्री अमोल भाऊ शिंपी, उपाध्यक्ष महेंद्र मराठे , कार्याध्यक्ष श्री जिभाऊ चित्ते, राकेश जैन, गजानन पवार, मुकेश अहिरे, महेश सोनवणे, हेमंत माळी, अनिल सोनवणे, सुरेश सोनवणे प्रकाश चौधरी, नंदलाल नेरपगार, स्वप्निल देसले इत्यादी दिव्यांग कार्यकर्त्यांनी दिव्यांग मंत्रालय घोषणेचा जल्लोषात स्वागत केले आहे.

Post a Comment

0 Comments