शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी -- तालुक्यातील
दोंडाईचा येथे महाराष्ट्र राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती शिंदखेडा अंतर्गत दोंडाईचा न्यायालयात लोक न्यायालयाचे आयोजन दि. 12 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या लोकन्यायालयातील 9 प्रकरणे निकाली काढण्यात आले. तर तडजोडीतून 3 कोटी 54 लाख 62 हजार 604 रुपयांची वसुली करण्यात आली.
लोकन्यायलायचे उदघाट्न दिवाणी न्यायाधीश श्री. अविनाश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दोंडाईचा बार असोशियशन चे अध्यक्ष अँड. रवींद्र राजपूत , अँड. एन.पी. अयाचित, अँड. डी. व्ही.पाटील, अँड. रूपचंदानी , अँड. एम.जी.शाह , अँड. जे.जे.वाघेला, अँड. आर. एच. धनगर, अँड. डी एम ठाकूर, अँड. मन्सूरी मॅडम सह आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
लोकन्यायालयात दिवाणी, फौजदारी, बँकेची कर्ज , ग्रामपंचायत वसुली, कौटुंबिक वादाची, बींएसएनएल,विज महावितरणाची समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरची दाखलपूर्व प्रकरणे आपसात समझोत्या करिता ठेवण्यात आली होती. यातील 9 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या लोकन्यायालयातून 3 कोटी 54 लाख 62 हजार 604 रुपयांची वसुली करण्यात आली.
लोकन्यायालय यशस्वी करणेकामी दोंडाईचा वकील संघाचे सर्व वकील व न्यायालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Comments