Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील मंगेश आबा पवार खरी शिवसेनेशी बेचाळीस वर्षांपासून नाड.*



     शिंदखेडा-( यादवराव सावंत व्यक्ती विशेष)-- तालुक्यातील पढावद गावातील रहिवासी असलेले सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिक मंगेश (आबा) हरलाल पवार यांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच स्व. बाबासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या कार्यास सच्चा शिवसैनिक म्हणून नाड जुळवून घेत आजतागायत एकाच पक्षाला साथ देत अनेकविध पदे उपभोगत शिंदखेडा मतदारसंघात आमदार व पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकाविण्यासाठी सिंहांचा वाटा राहिला आहे.            सुरुवातीला नोकरी निमित्ताने आपले गाव सोडून मुंबईत स्थायिक झाले तेथे त्यांनी एका कंपनीत फार्म सिटिकल म्हणून नोकरी केली. अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षीच शिवसेनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. मुळातच स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेनेला झोकून देऊन सच्चा शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी बांधीलकी जपली. त्याकाळात समतानगर कांदेविली येथे पहिली शाखा निर्माण झाली. त्या शाखेचे शाखाप्रमुख म्हणून अलिकडेच शिवसेना सोडून गेलेले रामदास कदम हे होते तर उपशाखा प्रमुख म्हणून मंगेश आबा पवार यांनी काम पाहिले आहे. सन -1990 साली नोकरी सोडली आणि आपल्या गावी म्हणजे पढावद येथे परतले. शेती व्यवसाय करुन शिवसेना मात्र सोडली नाही तर उलट शिवसेना वाढीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांची काम करण्याची पद्धत आणि वाणीत गोडवा ह्यामुळे पक्षाने त्यांना मानसन्मान दिला. गावाचा विकास करावा ह्यासाठी पॅनलप्रमुख म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे प्रथम उपसरपंच पदी त्यांची वर्णी लागली होती. तेथुन  राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावर देखील निवडुन आले. हळूहळू राजकारणात जम बसविला तोच पक्षाने बेटावद गटातुन त्यांच्या धर्मपत्नी संजुबाई मंगेश पवार यांना जिल्हा परिषद साठी उमेदवारी दिली. त्यात त्या सहज निवडून आले. शिंदखेडा मतदारसंघातला एक गट शिवसेनेच्या रुपात भगवामय झाला. पक्षाने त्यांच्या कामाची हातोटी पाहुन शिंदखेडा तालुका प्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. तालुक्यातील शिवसैनिक अधिक जुळून एक मोठी फळीच त्याकाळी निर्माण झाली. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक निवडणूकीत जिल्हा परिषद सदस्य साठी स्वतः ला उमेदवारी करण्याची संधी मिळाली त्यातही घवघवीत यश संपादन करुन सलग दुसऱ्यांदा धुळे जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले. त्यात गटात अनेक विकासाभिमुख कामे केली. नेहमीच सुख दुःख प्रसंगी हजेरी लावून मदतीचा हात पुढे सरसावला आहे. अशा प्रामाणिक शिवसैनिकांच्या हातात पुन्हा धुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य देखील विशेष जबाबदारी पक्षाने दिलेली अत्यंत प्रामाणिक पणे सांभाळून पुन्हा एकदा सच्चा शिवसैनिक असल्याचे सिद्ध केले. शिंदखेडा मतदारसंघात अधिक शिवसेना वाढीस जिल्ह्यातील पदाधिकारी सह त्यांनी मोलाची कामगिरी न्यारीच होती. पक्षाने पहिला शिवसेनेचा आमदार व्हावा यासाठी रामकृष्ण तात्या पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत देखील जिल्यातील पदाधिकारी सोबत प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत पहिला आमदार निवडून दिला त्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका बजावत सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या काळात शिंदखेडा पंचायत समिती सभापती, उपसभापती  पंचायत समिती वर भगवा फडकला आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर भगवा फडकविण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. कोणत्याही प्रकारची अभिलाषा जात पात धर्म न पाळणाऱ्या ह्या शिवसैनिकांची आजही एक साधा माणूस म्हणून जगताना दिसते. सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा यासाठी सतत कार्यतत्पर म्हणून आजही ओळख आहे. ते उपजिल्हा प्रमुख देखील राहिले आहेत आता सध्या धुळे जिल्हा संघटक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रवासात जिल्ह्यातील नेत्यांमध्ये संपर्क प्रमुख हिलाल आण्णा माळी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंखे, महेश मिस्त्री, यांसह पदाधिकारींची साथ लाभली आहे. आजही स्व. बाबासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला असुन भविष्यात शिंदखेडा मतदारसंघात पुन्हा आमदार होण्यासाठी कुणाही सच्चा शिवसैनिकाला संधी मिळाल्यास त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची खात्री ह्या निमित्ताने त्यांनी दिली आहे. माझा जन्म शिवसेना उभी करण्यापासून झाली असून आज बेचाळीस वर्षांपासून नाड असलेल्या पक्षाशी  अखेरपर्यंत शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी बांधीलकी कायम राखली जाईल असे सांगितले.

Post a Comment

0 Comments