Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात येथे नुकतीच पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ नेहरू चाचा यांची जयंती म्हणजेच ' बालदिन ' मोठ्या उत्साहात संपन्न



       
       शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात येथे नुकतीच पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ नेहरू चाचा यांची जयंती म्हणजेच ' बालदिन ' मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
           यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम होते,त्यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ पुष्प, पुष्पहारअर्पण करण्यातआले.त्यानंतर 
विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ नेहरू चाचा यांच्याविषयी भाषणे दिलीत.तद्नंतर विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू - भगिनींनी यांनीही भारत रत्न प.ह.नेहरू यांच्या जीवनशैलीविषयी मनोभाव व्यक्त केलेत. 
        शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम यांनी म्हटले की,भारत रत्न व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे विज्ञानाचे उपासक होते जेव्हा समाजाच्या कुठल्याही घटकांमध्ये ते सहजतेनं वावरत ते लहान मुलांत वावरताना ते लहानाहून लहान होत,त्यांच्याशी खेळण,गोष्ट सांगणं यांची त्यांना भारी हौस! व मुलांच ही त्यांच्यावर फार प्रेम सारी मुलं त्यांना ' चाचा नेहरू ' म्हणत ते म्हणतं ही मुलं म्हणजे उद्याच्या भारताचे नागरिक आहात;या देशाची प्रगती,विकास त्यांच्याच आहे याची त्यांना जाणीव होती.ते म्हणत मुलं हा राष्ट्राचा अमोल ठेवा आहे,तो प्राणपणानं जपला पाहिजे .व शेतकर्‍याविषयी म्हणत की,शेतकर्‍याचे जीवन जो पर्यंत सुधारत नाही,तो पर्यंत देशात शांती आणि समृध्दी येणार नाही.त्यासाठी प्रथमतः देश स्वतंत्र झाला पाहिजे,स्वातंत्र्य संग्राम चळवळ अशा विविध विषयानुसार महत्त्व पटवून दिलेत..
" भारताच स्वातंत्र्य समृद्धी व प्रगती या ध्येयासाठी उभी हयात व्यतीत  करणारे ' नेहरू ' हे खरं तर मानवतेचे महान उपासक होते जागतिक शांततेसाठी ते आयुष्यभर झटले शांतिदूत म्हणून सारं जग त्यांना ओळखतं "
      यावेळेस कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग,मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.व कार्यक्रमाची सूत्रसंचालन श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार - श्री.आर बी गवळे यांनी मानले.व कार्यक्रम सांगता वेळेस सर्व विद्यार्थ्यांचे चाॅकलेट देवून त्यांचे कौतुक करण्यात आले की,मुले ही देवा घरची फुले असतात त्यामुळे त्यांचे सन्मान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments