Header Ads Widget

*शिंदखेडा येथील व्ही.के.पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे बालकदिन उत्साहात संपन्न*




शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी -
         व्ही.के. पाटील इंटरनॅशनल स्कूल शिंदखेडा येथे भारताचे पहिले  पंतप्रधान मा.पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन दि.१४ नोव्हेंबर २२ सोमवार रोजी ' बालकदिन ' म्हणून उत्साहात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाच्या अध्यक्षा मा.मीनाताई पाटील प्रमुख अतिथी तसेच विद्यालयाचे प्राचार्य धनंजॉय सिंह उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे अतिथी व प्राचार्य यांनी मा. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कु.सेजल कोळपकर या विद्यार्थिनींने  केले. शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षकांनी बालपणातील शालेय आठवणी जागृत करून विद्यार्थी वर्गात कसा खोडकरपणा करतात हे विद्यालयातील शिक्षकांनी सादर केलेल्या लघुनाटिकेच्या माध्यमातून दाखवून दिले व शिस्तीचे महत्त्व पटवून सांगितले.
       प्राचार्य मा. धनंजॉय सिंह यांनी उद्बोधनपर मार्गदर्शन केले लहान मूल हे मातीचा गोळा असते ते निरागस असते , संस्कारक्षम असते , बालवयात त्यांच्यावर संस्कार होतात त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडते ' संस्कार शिकवले जात नाहीत किंवा शिकता येत नाहीत ते घडत असतात '  लहान मुलं आपल्या भोवती घडणाऱ्या गोष्टी पाहत असते आणि त्याप्रमाणे त्याचे जीवन घडत असते असे विद्यालयाचे प्राचार्य यांनी प्रतिपादन केले. विद्यालयाचे शिक्षक मनोज पाटील सर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला इयत्ता नववीतील कु. मनश्री पाटील हिने मनोगत व्यक्त केले.
       कार्यक्रमाचे संचालन कु.सेजल कोळपकर तर आभार समर्थ गिरासे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments