म्हळसर (छोटू वारूडे प्रतिनिधी)
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात नुकताच अगस्तऋषीमुनी महाराज यांची प्रतिमा लोकार्पण करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था.संचलित अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी ता.शिंदखेडा जि.धुळे या विद्यालयात कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचारी मा.आप्पासाहेब श्री.दिनेश दामू कदम यांचे पिताश्री आदरणीय बापूसाहेब श्री.दामूजी सखाराम कदम(कलमाडी) यांच्याकडून विद्यालयास अगस्तमुनी ऋषीजींची फोटो प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आले व दिलेली सप्रेम भेट फोटो स्विकारतांना विद्यालयाचे आदरणीय,मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम व शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद यांच्यासह ऋषिवर्य अगस्तमुनी ॠषीमुनी यांचा फोटो विद्यालयात सप्रेम भेट म्हणून स्वीकारण्यात आले.व सप्रेम भेट फोटो देणाऱ्याचे विद्यालयाकडून आभार मानण्यात आलेत.

0 Comments