मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना रहिवासी वस्तीतील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की वीर एकलव्य नगरातील वरपाडे रोड अमरधामच्या बाजूला आदिवासी समाजाची दफनविधी भुमी जागा असुन ती स्वच्छ जेसीबी मशीन च्या साह्याने रस्त्यावरील काटेरी झाडेझुडपे खड्डे साफ करून रस्ता मोकळा करावा तसेच आदिवासी वस्तीतील लेंडी नाल्यांची साफसफाई करून क्रांक्रटीकरण व संरक्षण भिंत बांधून मिळावी तसेच पंतप्रधान घरकुल आवास योजना च्या अटी शर्ती रद्द करण्यात यावेत अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे केली आहे. ह्यावेळी वीर एकलव्य नगरातील सामाजिक कार्यकर्ते जिभाऊ फुले, दिलीप भिल, राहुल भिल,भुरा सोनवणे, कैलास मालचे, भिमसिंग भिल, आधार भिल, राजु भिल, कैलास हिरामण भिल , सिताराम माळी यांच्या सह रहिवासी नागरिक उपस्थित होते.


0 Comments