कासोदा ता एरंडोल : माय शब्दामधे खूप काही मोठे रहस्य सामावलेले आहे . जीवनाच्या वाटचालीत आईचे महत्व सर्वश्रृत आहे . ते प्रत्येकाने अनुभवलेले असते . काही व्यक्ती वगळता सर्वांनाच आई पणाचा अनुभव मिळालेला असतो . आईच्या हदयाची समानता या पृथ्वीतलावर मिळूच शकत नाही मिळणार पण नाही . आई शिक्षित असो की अशिक्षित तिच्या हदयात बदल होऊच शकत नाही . तिचे महान रुप तिची महानता तिच्या विचारांची प्रग्लब्धता खूपच श्रेष्ठ ठरलेली आहे . आई विषयीच्या अनेक गोष्टी प्रसंग अनुभवात येतात .परंतू आईचे मन व हदय श्रेष्ठच ठरलेले आहे . असाच जीवनात येणारा प्रसंग आईच्या उपस्थितीत विना पोरका करून जातो .एका मोठ्या परिवारातील कोकिलाई एक सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी तसेच धार्मीक श्रध्दे वर विश्वास ठेवणारी प्रसंगाना तोंड देणारी , हिमंत देणारी , जोश निर्माण करणारी शक्ती , प्रगतीची व चांगल्या संस्कारांची दिशा दाखवणारी कोकिलाई आपल्यातून अचानक निघून गेल्याने कुंटुब एकदम स्तब्ध झाले . अनेक कटू प्रसंगातून आपल्या कुटुंबाची घडी मात्र बसून गेली ते फक्त तिच्या संस्कारामुळे व विचारांमुळे शक्य होऊ शकले .एका बलाढ्य परिवारात जन्माला येऊन साधारण परिवाराला परीसचा स्पर्श लागावा व सोन्याचा परिवार निर्माण करण्याची ताकत फक्त आईच करू शकते . समोर अनेक प्रसंग असतांना त्यांना निडरपणे हाताळून यशस्वी कसे व्हावे हे संस्कार मुलांवर टाकले . ते यश आईने काही काळ पाहिले .परंतु ती आमच्यातून अचानक निघून गेल्याने सर्व परिवार मात्र सुन्न झाला होता . खूप कमी वयात विधवा पण आले होते . सर्वच जबाबदारी परिवाराची एकदम आली .परंतु न हारता मात्र परिवाराला धीर दिला . तीन मुले १ मुलगी असा परिवार खूप बिकट प्रसंग पण मुलांना व मुलीला चांगले संस्कार दिले . ती नसतांना तिच्या संस्कारामुळे कुटुंब आपोआप यश गाठत जात आहे . तिघ मुले त्यांचा परिवार अतिशय सुखमय व प्रगती वर आहे कन्या मंदा आक्काचे अचानक अपघाती निधन झाल्याने खूप मोठा दुःखाचा डोंगर हदयावर अचानक आला . ते सावरूच शकत नव्हती म्हणून स्वतःचे जीवन संपवले . मात्र तिच्या आशिवादामुळे कन्येचा परिवार ही अतिशय प्रगतीशील व संस्कार मय आहे . हे फक्त एका आईने सिध्द करून दाखविले . आईची किमया खूप महान असते .जीवनात प्रत्येकालाच आईचा सहवास मिळावा . हिच प्रार्थना
कोकिलाई
कोकिळेचा आवाज कसा
मन भरवून जातो तसा
कोकिळेची किमंत कशी
जगात नाही कुठे तशी
कोकिळेचे प्रेम कसे
.. कुणा जवळ नाही तसे
कोकिळेच रुप कसे
संस्कारानी भरलेले जसे
कोकिळेची माया कशी
शोधून मिळणार नाही तशी
कोकिळेच हदय कसे
ममतेने भरलेले जसे
कोकिळेचा सहवास कसा
अनंत काळ टिको तसा
कोकिळेचा स्वभाव कसा
. शोभून दिसेलच तसा
कोकिळेचा दुरावा कसा
सोडून जाणारा नको तसा
कोकिळेची उपमा कशी
कुठेच मिळणार नाही तशी
जीवनातील अनुभवलेले प्रसंग व वेळोवेळी दिलेली आईची साथ तिची हिमंत व संस्कार तिचे हदयस्पर्शी प्रसंग मनाला भारावून जातात ती या जगात नसली तरी तिचे अस्तित्व मात्र कायम तेवत राहिल . स्व .कोकिला आईस
पी पी पाटील परिवारा मार्फत भावपूर्ण श्रध्दांजली
संकलन
प्रमोद पाटील चिलाणेकर , मुख्याध्यापक धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय आडगाव, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय युवा युथ शक्ती संगठन महाराष्ट्र राज्य, खानदेश भुषण पुरस्कार प्राप्त.
दत्तनगर कासोदा ता एरंडोल
मो न 8975271099


0 Comments