शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी -- शिंदखेडा मतदारसंघातील माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करणाऱ्या अशांना पन्नास हजारांची मदत मिळावी यासाठी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर, साक्री,धुळे या चारही तालुक्यात महात्मा ज्योतिराव फुले योजनेतंर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला होता. परंतु आताच्या शिंदे फडणवीस सरकारने फक्त दहा टक्के शेतकऱ्यांना मदत केली आहे तरी उर्वरित शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी आपण विरोधी पक्षनेते म्हणून शासनास महात्मा ज्योतिराव फुले योजनेतंर्गत सन-2017-18 व सन-2019-20 ह्या दोन वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये ची मदत मिळावी यासाठी शासनास भाग पाडावे. शेतकरी रोज बँकेत चकरा मारत असतो परंतु पैसे खात्यात जमा न झाल्याने रिकाम्या हाताने परत जात असतो.असे निवेदनाद्वारे विनंती केली आहे. त्यानंतर माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यात सुमारे एक दिड तास चाललेल्या चर्चेत शासनाच्या लक्षात आणून देवु त्याकरिता हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडुन शासनाचे लक्ष वेधले जाईल आणि शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये ची मदत मिळवून दिली जाईल असे आश्वासन दिले. म्हणून धुळे जिल्ह्यातील चार ही तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून ह्यासाठी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व शिंदखेडा मतदारसंघातील माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.
0 Comments