धुळे ( प्रतिनिधी ) :
पशुसंवर्धन विभागाच्या लिपिक वर्गीय संवर्गातील कर्मचाऱ्यांनी अन्याय कारक आकृतीबंधाच्या निषेधार्थ आज भोजन काळात काळ्याफिती लावून निदर्शने केली व काम ही केले.
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे नवीन आकृतीबंधात कर्मचारी प्रशासन तसेच वेतनावरील खर्च कमी करण्याचे हेतूने,अनावश्यक पदे निरासीत व सामायोजित करण्याच्या अनुषंगाने मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील पशुसंवर्धन दुग्ध विकास व महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत,पशुसंवर्धन विभागाने सादर केलेल्या आकृतीबंधावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे एकूण न घेता, मंत्री महोदयांनी डिजिटल युगात लिपिक वर्गीय संवर्गाची गरज नाही. या भावनेतून त्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या बदल कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीच्या तीव्र भावना व्यक्त होत आहेत. यामध्ये या नवीन आकृतीबंधात अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या संख्या उपलब्ध करण्याचा घाट असून, त्यामध्ये जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ऐवजी त्या पदाचा दर्जावाढ, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मध्ये करणार. सर्व तालुका स्तरावर तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाची निर्मिती तसेच पंचायत समिती स्तरावर पशुधन विकास अधिकारी( विस्तार ) क वर्ग ऐवजी सहाय्यक आयुक्त या पदांमध्ये दर्जा वाढ करण्यात येणार तसेच राज्यस्तराकडे श्रेणी १ व श्रेणी २ चे दवाखाने जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित होणार या सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांच्या उपयोगाची व फायद्याची तसेच लोकाभिमुख असली तरी मात्र, या आकृतीबंधात लिपिक वर्गाची तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयातील वरिष्ठ लिपिकाची पदे निरासीत करण्याचे प्रस्तावित आहे.
त्यामध्ये लघुलेखक (कनिष्ठ) कार्यालयीन अधीक्षक,वाहन चालक, नाईक शिपाई व परिचर, व्रणोपचार ही पदे निरासीत करून यापुढे शिपाई, वाहन चालक व कनिष्ठ लिपिकाची पदे कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. ही बाब प्रशासनाच्या कामकाजाचा व्याप व गतिमान प्रशासनाच्या कामकाजाची गती कमी करणारी आहे.परिणामी लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढवून, शारीरिक मानसिक व कौटुंबिक स्वास्थावार विपरीत परिणाम होणार आहे.गट क आणि ड ची पदे गोठवल्यामुळे भविष्यात मयत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना, अनुकंपा तत्वाच्या भरतीच्या संधीपासून मुकावे लागणार आहे. तसेच तालुका लघु पशुचिकित्सलायची लिपिकाचे पद निरासीत केल्याने तेथील लेखा शाखेचे कामकाज संपुष्टात येणार आहे. गट क व ड ची पदे गोठविण्याच्या भूमिकेच्या निषेधार्थ पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ धुळे जिल्ह्यातील श्री प्रशांत साळुंखे, नरेंद्र भुजबळ, बापुसाहेब बोराडे,दिपक अनारसे,नरेश माळी,करुना बिलारे या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी भोजन काळात निषेध नोंदवून काळ्याफिती लावून काम केले.
यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि मराठी पत्रकार परिषद मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇
https://kutumbapp.page.link/NjbBWJhZAakx452j7?ref=06KXN

0 Comments