Header Ads Widget

*शिंदखेडा येथील भोईराज पतसंस्थेच्या ठेविदाराचे पैसे तात्काळ परत मिळावे यासाठी सहाय्यक निबंधक यांची मध्यस्थी - बेमुदत धरणे आंदोलन तुर्तास स्थगित* *मॅनेजर आणि कर्जदार संचालक मोकाट अन् ठेवेदार , खातेदार संकटात*




                शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी---             शिंदखेडा  येथील भोईराज पतसंस्थेमध्ये दोन वर्षापूर्वी जवळपास एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला उघडकीस आलेला आहे.  भोईराज पतसंस्थेचे मॅनेजर सुनील वाडिले


 यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक ही झाली परंतु भोईराज पतसंस्थेमध्ये मध्ये अनेक हातमजूर, गोरगरीब लोकांचे पैसे व ठेवी दोन वर्षापासून अटकलेले आहेत, गोरगरीब लोकांचे मेहनतीचे पैसे दोन वर्षापासून प्रशासक बसून सुद्धा एक रुपयाची वसुली केलेली नाही आणि गोरगरीब लोकांना पैसे परत केलेले नाही. उलट मॅनेजर , कर्जदार संचालक,इतर कर्जदार मोकाट फिरत आहेत अन् ठेवेदार खातेदार संकटात सापडले आहेत. म्हणून  सर्व  ठेवीदार भिल समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आधिच  तहसिलदार व सहाय्यक निबंधक यांना निवेदन देण्यात आले होते, निवेदन द्वारा म्हटले होते की, ठेवीदारांचे गोरगरीब लोकांची पैसे तात्काळ मिळावेत.  देत आहोत, अशी उडवाउडवीची उत्तरे प्रशासक कोकणी हे ठेवीदारांना देत होते. म्हणून सन्तप्त ठेवेदारांनी आम्हाला आमचें पैसे 10 दिवसांच्या आंत पैसे मिळाले नाही तर तहसिलदार कार्यालय शिंदखेडा समोर 21 नोव्हेंबर रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यापाश्वभुमीवर नुकतीच शिंदखेडा येथील सहकार कार्यालयात सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी चर्चा घडवून आणली. ह्यावेळी भोईराज पतसंस्थेचे प्रशासक कोकणी व भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे सह ठेवेदार सहभागी झाले होते. चर्चेअंती भोईराज पतसंस्थेचे कर्जदार संचालक व इतर कर्जदार यांच्यावर कारवाई करावी त्यासाठी कर्जवसुली नोटीस बजावण्यात यावी, जप्तीची कारवाई सुरू करावी तसेच कर्जवसुली पोटी कर्जदारांने धनादेश दिलेले   बँकेत खात्यात जमा करावेत. हे कारवाई आठ दिवसांच्या आत करावी आणि तीस तारखेच्या आत सर्व ठेवेदारांना काही प्रमाणात रक्कम अदा करण्यात यावी तसेच टप्प्याटप्प्याने ठेवेदारांची पुर्ण रक्कम परत करावी अशी ताकीद ह्यावेळी सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी भोईराज पतसंस्थेचे प्रशासक कोकणी यांना उपस्थित ठेवेदारासमक्ष लेखी स्वरूपात दिली. तर सर्वस्वी जबाबदारी प्रशासक यांची राहील असे सांगून सहाय्यक निबंधक यांनी आपले अंगावर चे घोंगडं झटकले. लेखी स्वरूपात आश्वासन घेतल्यानंतर आठ दिवसांच्या आत कर्जदारांना नोटिसा बजावणे व तीस तारखेच्या आत सर्व ठेवेदारांना काही प्रमाणात रक्कम अदा करणे ह्या अटींवर 21 रोजी बेमुदत धरणे आंदोलन तुर्तास स्थगित करत असल्याची माहिती दिली .हयाप्रसंगी नगरपंचायत प्र.नगराध्यक्ष दिपक देसले,भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे, चंद्रकांत सोनवणे, सुनील सोनवणे, श्रावण मराठे, हिराबाई परदेशी, अविनाश पाटोळे, बानुबाई भिल, अनिल कापुरे , मायाबाई भोई , नाना भोई, परसुराम भोई , गोकुळ भोई, काशीनाथ भोई, वामन भोई, किशोर चौधरी, गोफी शिंपी, पानाबाई भिल, सुरेखाबाई भिल, कृष्णा भोई आदी ठेविदार व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments