शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी - येथील नगरपंचायत हद्दीतील स्टेशन रोडवरील जलकुंभाला कै.माजी आमदार मंगलसिंग राजपूत उर्फ ठाणसिंग जीभाऊ तर विरदेल रोड जलकुंभाला कै.माजी पंचायत समिती सभापती दयाराम धोंडु देसले हे नावे पाणी पुरवठा योजना सुरू होण्यापूर्वी देण्यात यावी यासाठी काँग्रेसचे माजी प्र.नगराध्यक्ष दिपक देसले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नगरपंचायत काँग्रेसचे नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना निवेदन देण्यात आले. ह्यावेळी काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते सुनील बाजीराव चौधरी, नगरसेवक दिपक अहिरे, संगीता किरण थोरात, अशोक पोपटराव बोरसे सह भिल समाज विकास मंचचे बापुजी फुले, सुनील सोनवणे, राजेश मालचे, श्रावण मराठे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
0 Comments