Header Ads Widget

कमलाबाई शं. कन्या शाळेच्या निवृत्त शिक्षिका देविका नथ्थू शिरसाळे यांचे दीर्घ आजाराने निधन




धुळे- येथील कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेच्या निवृत्त शिक्षिका सौ. देविका नथ्थू  शिरसाळे यांचे काल दि. 23 नोव्हें. रोजी रात्री दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 66 वर्ष होते. धुळे पालिकेचे निवृत्त शिक्षक नथ्थू हांडू शिरसाळे (नेर) यांच्या त्या पत्नी होत्या. तर पुणे येथे अभियंता असलेले आशुतोष शिरसाळे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, 3 मुली, नातवंडे असा परिवार आहे. आज दि. 24 रोजी साक्री रोड, मलेरिया ऑफीसमागील सुरभी कॉलनीतील निवासस्थानातून निघालेल्या अंत्ययात्रेत सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. कुमारनगर स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळावु स्वभावाच्या असलेल्या स्व. सौ. देविका शिरसाळे यांची कमलाबाई कन्या शाळेत विद्यार्थिनीप्रिय, अभ्यासु, उपक्रमशिल शिक्षिका म्हणून ख्याती होती.

 


Post a Comment

0 Comments