Header Ads Widget

नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्राची केंद्रीय पथकाकडून कसुन पाहणी

         
            
              नरडाणा :-  येथील आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान एन. एच. एम. कार्यक्रमा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची समीक्षा करण्यासाठी केंद्र सरकारच्या 14 प्रतिनिधींचा समावेश असलेले कॉमन रेव्ह्यू मिशनचे पथक सहा दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले आहे. या पथकाने आज सकाळी नरडाणा येथील आरोग्य उपकेंद्रात व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन पाहणी केली. तदनंतर पथकाच्या दोन महिला सदस्यांनी विविध लाभार्थ्यांना मिळालेल्या आरोग्य विषयक योजनांच्या लाभाची माहिती घेतली. नंतर पथकाच्या सदस्यांनी नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली व आरोग्य केंद्राच्या एकंदर कार्यावर समाधान व्यक्त केले.                          यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य पथकाने आज नरडाणा येथे भेट दिली. यात पथकाच्या दोन महिना सदस्यांनी नरडाणा गावाजवळ असलेल्या एका उपकेंद्राला भेट दिली. यावेळी उपस्थित असलेल्या आशा कार्यकर्त्यांसह उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी विविध बाबींची विचारपूस केली. तदनंतर पथकाच्या दोन्ही सदस्यांनी शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संवाद साधला. व त्यांना ज्यांना योजनेचा लाभ मिळाला त्या योजना मिळण्यात काही अडचणी आल्यात का? आशा कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले का? ॲम्बुलन्स वेळेवर आली होती का? प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी आदींनी सहकार्य केले होते का? असे विविध प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधला.                       यानंतर पथकाच्या दोन्ही सदस्यांनी नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी नरडाणा येथे येणार असल्याने नरडाण्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्र ने 'कात टाकली' आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे जणू नूतनीकरणच करण्यात आले आहे. यात विविध आरोग्य विषयक शासकीय योजनांची माहिती, आरोग्य विषयक सर्वच महत्त्वाचे मोबाईल, नंबर विविध आजारांची लक्षणे, त्यावरील खबरदारीचे उपाय. आदींचे फलक लावण्यात आले आहेत. गेल्या अनेक आठवड्यांपासून नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांनी यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली होती यामुळेच प्राथमिक आरोग्य केंद्राचा चेहरा मोहरा बदलला आहे. यावेळी उपस्थित केंद्रीय पथकाच्या दोन्ही सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे शव विच्छेदन गृह, त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले रजिस्टर, सह व्हॅक्सिन रजिस्टर, लसीकरण विभाग, केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजना त्यांची अंमलबजावणी, प्रसुती विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आवार, तिथली स्वच्छता, ॲम्बुलन्स, ॲम्बुलन्स मधील सेवा, ॲम्बुलन्सचे चालक, विविध कर्मचारी, आदींची संवाद साधला. व विविध प्रश्न विचारलेत. यावेळी नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकंदर कार्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. प्रकाश पाडवी, डॉ. मनोज राजपूत, वैभव केले, विकास गायकवाड, विवेकानंद पाटील, यशोदीप पाटील, महावीर मीना, भारती पावरा, संजय पाटील, प्रभादेवी बागले, शिवम शिरसाट, स्वप्निल शिरसाट, गोपाल भोई, घोरपडे, ॲम्बुलन्स चालक जयेश बोरसे, दीपक माळी आदींशी संवाद साधला. केंद्रीय टीम जवळजवळ पाच तास नरडाणा येथे थांबली.

Post a Comment

0 Comments