शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी --
तालुक्यातील अंजनविहरे येथील हिरामण शिवराम पदमोर यांच्या शेतात अचानक आग लागली होती. या आगीत अंदाजे 40 ते 45 क्टिंटल मका जळून खाक झाल्याची घटना आज
सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली असून ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हिरामण पदमोर यांच्या मालकीच्या शेतात मक्याची कापणी करून एका ठिकाणी गोळा करून ठेवले होते. शेतातून गेलेल्या विजेच्या तारा एकमेकांना स्पर्श झाल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन टिणग्यां पिकावर पडल्याने आग लागली. त्यामुळे तीन एकर मक्याचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले. दरम्यान हे नुकसान प्रशासन अथवा वीज वितरण कंपनी भरून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून याप्रकरणी अग्नी उपद्रवाचे नोंद करण्यात आले...


0 Comments