शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी --
तालुक्यातील विखरण येथील पंडित दयाराम शिंदे (वय ५२ वर्ष) यांचा अचानक चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ते शेतातून काम करून घरी आले. त्यांना अचानक चक्कर येऊ लागल्याने उपचारासाठी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी दाखल केले असता उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्जुन नरोटे यांनी तपासून मृत घोषित केले. श्रावण दयाराम शिंदे ( रा. विखरण ) यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात खबर दिल्याने आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख करित आहे.

0 Comments