Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यातील* *भडणे येथे रेशन दुकानात आनंदा शिधा किटचे वाटप*




शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी --.        तालुक्यातील भडणे येथे सर्व सामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी व भाऊबीज स्वस्तात साजरी व्हावी म्हणून शिंदे-सरकारने शिंदखेडा तालुक्यातील गरीब नागरिकांना प्रथमच साखर, चणाडाळ, रवा,तेल अशा चार वस्तू आहे. आनंदाचा शिधा किट रेशन दुकानात व शिंदखेडा शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या रेशन दुकानात  तहसीलदार आशा गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली  शिंदखेडा तालुक्यात सुरुवात झाली आहे पुरवठा अधिकारी तृप्ती दुधे  यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात आनंद शिधा किडचे वाटप करण्यात येत आहेअशा प्रमाणेच भडणे,येथे सुरुवात झाली आहे.दिवाळी गेली खाली पण तुळशी विवाह च्या मुहूर्तावर रोजी सकाळी नऊ वाजता भडणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संचलित स्वस्त धान्य दुकानात दुकान नंबर १५८ लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील संस्थेचे चेअरमन मोहन गोसावी उपसरपंच जगतसिंग गिरासे भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी  ग्रामस्थांच्या   यांच्या हस्ते आनंदाचा शिधा  वाटप करण्यात सुरुवात झाली. शिधापत्रिकाधारकांना  आनंद शिधा किटचे वाटप करण्यात आले. , यावेळी नागो पाटील धर्मा चौधरी दगाजी पवार  भडणे ग्रामस्थची उपस्थिती होती.उशिरा का होईना दिवाळी व तुळशी विवाह जरी गोड नाही झाला नसला तरी मात्र उशिरा का होईना आनंद शिधा वाटप करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले

Post a Comment

0 Comments