Header Ads Widget

*महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरात या राज्यात जात आहेत त्याविरुद्ध माननीय मुख्यमंत्री यांना तहसीलदार वसई द्वारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यापार उद्योग सेल वसई विरार शहर जिल्हा तर्फे निवेदन*



वेदांता- फॉक्सकॉन पाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा टाटा एअरबस प्रकल्प ही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहान मध्ये साकारण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न होता.त्या प्रकल्पामध्ये 22 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. या शिंदे-फडणवीस सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला आहे यामुळे पुन्हा एकदा राज्य औद्योगिक क्षेत्रात मागे पडत आहे.केंद्र सरकार नेहमीच गुजरातला झुकते माप देताना दिसत आहे भविष्यात अशी आव्हाने येत राहिली तर महाराष्ट्र ही बेरोजगारांची भूमी म्हणून गणला जाईल,याच्या निषेधार्थ
 राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभाग महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष नागेश जी फाटे साहेब यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष राजारामजी मुळीक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापार उद्योग सेल वसई विरार शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गणेश गुप्ता  यांच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार वसई द्वारा निवेदन दिले

Post a Comment

0 Comments