Header Ads Widget

वसंतदादा म्हणजे अल्पशिक्षित माणसातील अत्युच्च पातळीवरचं शहाणपण…



महाराष्ट्रातील गावागावात पुणे-मुंबईसारखी कॉलेजं निघाली, आणि शाळेला न जाणारी पिढीही मग अभियांत्रिकी करुन देशापरदेशात जाऊ लागली, ती सगळी देण आहे ती वसंतदादा पाटील यांची.वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते अल्पशिक्षित होते, परंतु मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी / वैद्यकशास्त्राची महाविद्यालये काढण्याचा निर्णय यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले.‘मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावे, अशी दादांची कार्यशैली असे,सहकार क्षेत्र असेल किंव्हा शिक्षणक्षेत्र यामध्ये दादांनी अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले अश्या माणसाची आज जयंती आहे..🌸🌷

Post a Comment

0 Comments