शिंदखेडा /(यादवराव सावंत) प्रतिनिधी : जळगाव जिल्हातील नामांकित आदिलशाह फारूकी बहुउदेशीय मार्फत दिला जाणारा खान्देश भुषण पुरस्कार २०२२ एरंडोल तालुक्यातील सामाजिक , शैक्षणिक , साहित्यीक , पत्रकारिता व सहकार क्षेत्रातील नामंकित व्यक्तीमत्व प्रमोद पाटील चिलाणेकर यांना जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अल्पबचत भवन येथे मोठ्या दिमाखदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा उपमहापौर डॉ करीम सालार होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाऊक पटेल यांनी केले . प्रमुख अतिथी म्हणून शिवश्री संजीव सोनवणे ऍड जुबेर शेख , मुक्ती हारून नदवी, मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख , ज्येष्ठ पत्रकार डॉ नुरोउदीन मुल्लाजी डॉ शिरीप बागवान लोकनियुक्त सरपंच भावना माळी , उमेश कासट , कविता पाटील पत्रकार बांधव उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुप्रसिध्द साहित्यीक यशवंत निकवाडे व संस्था अध्यक्ष फारूक शाह यांनी केले . प्रमोद पाटील चिलाणेकर हे एरंडोल तालुक्यातील नामंकित असलेली धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक असून तालुक्यात शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून ख्याती आहे . ते महाराष्ट्र राज्य युवा यूथ संघठनचे प्रदेशाध्यक्ष , आखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष , भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष , राष्ट्रीय मानवाधिकार न्याय सामाजिक संगठनचे जिल्हाध्यक्ष राज्य समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष , तालुका अध्यापक संघाचे अध्यक्ष टि डि एफ तालुकाध्यक्ष व सहकार क्षेत्रातील नामंकित संस्था कै आबासाहेब खंडेराव श्रीपत पाटील सहकारी संस्थेत संचालक आडगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व शाळेचे सचिव, एरंडोल व धरणगाव तालुका शिक्षक व कर्मचारी सहकारी संस्था चेअरमन तसेच जनउघम ग्राहक कल्याण परिषद , तोकमत पत्रकार , पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र मराठा पाटील समाज बहुउदेशीय संस्थेचे कार्य ध्यक्ष , आदर्श गांव विकास मंचचे कार्यध्यक्ष अशा अनेक समित्यावर यशस्वी काम पाहत आहे . कामाचे नियोजन व आयोजन करण्यात प्रमोद पाटील चिलाणेकर यांचे कार्य यशस्वी असते . कोकिलाई नावाचा काव्यसंग्रह निर्मिती सह निगर्वी , निस्वार्थी समाजसेवक तसेच सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे व्यक्तीमत्वास खान्देश भुषण पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरावरून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे

0 Comments