*धुळे दि.26.* कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सुपुत्र श्रीमंत स्व.राजमाता पद्माराजे कदमबांडे यांचे पिताश्री "श्रीमंत छत्रपती स्व. राजाराम महाराज तिसरे (करवीर संस्थान)" यांच्या ८२ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतांना त्यांचे नातू माजी आमदार तथा धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीमंत सरदार राजवर्धनसिंहराजे कदमबांडे, श्रीमंत सरदार प्रियदर्शनराजे कदमबांडे, सरदारकुमार हर्षवर्धन कदमबांडे सोबत साहेबराव देसाई, लहू बापू पाटील, निंबा मराठे, राजन चौक, मुन्ना आप्पा शितोळे, राजेंद्र इंगळे, संदीप पाटोळे, राजकुमार बोरसे, तेजस जाधव, वीरेंद्र मोरे, गणेश चौधरी, भरत वाघारे, हरीश शेलार, सचिन आखाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.आज सायंकाळी राजवर्धन कदमबांडे साहेबांच्या निवासस्थानी स्व. राजाराम महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कोल्हापूर शहरात शालिनी पॅलेस, बी. टी. काॅलेज, छत्रपती शिवाजी टेक्निकल, ट्रेझरी, राधाबाई बिल्डींग (कोर्ट), कलेक्टर ऑफीस, लाॅ काॅलेज अशा खूप देखण्या वास्तू श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांनी उभारलेल्या आहेत.छत्रपती शाहू महाराज, आईसाहेब महाराज, प्रिन्स शिवाजी महाराज यांचे पुतळे श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांच्या संकल्पनेतून उभे राहिले आहेत. केवळ वास्तूच नव्हे, तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर 1922 ते 1940 अशी एकूण आठरा वर्षे श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार पाहीला. राजा म्हणजे राजवाडा ऐषोरामी यात गुंतून न रहाता राजाराम महाराजांनी कोल्हापूरला नवा व आधुनिक मार्ग दाखवला.त्यांच्या काळात रंकाळा तलावाच्या काठावर शालिनी पॅलेस उभा राहिला.
शाहू महाराजांनी सुरू केलेले राधानगरी धरणाचे काम त्यांनी पूर्णत्वास नेले. दसरा चौकात शाहू महाराजांचा, लक्ष्मीपुरीत आईसाहेब महाराजांचा देखणा पुतळा उभा केला. याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात बाळंतपण व शिशुउपचार असे स्वतंत्र मोफत उपचार कक्ष सुरू केले. कोल्हापूर बँकेची त्यांनी स्थापना केली. लक्ष्मीपुरी परीसराची उभारणी केली. जयभवानी फुटबॉल टिमची स्थापना करून उभरत्या खेळाडूंना संधी मिळवून दिली.
कोल्हापूरच्या विमानतळावरून पहिल्या विमानाने अवकाशात भरारी राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतच घेतली.छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा त्यांनी पुण्यात उभारला.लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी डोंगराएवढे उभे केलेले काम पूर्णत्वास नेणे, हे तर त्याहून मोठे काम त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी केले. राजाराम महाराजांनी या कामावर पूर्णत्वाचा तुरा चढवला आणि आपल्या कार्यशैलीचा वेगळा ठसा कोल्हापूरच्या मनावर उमटवला."श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज (करवीर संस्थान) यांच्या ८२व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महाराजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!💐💐💐🌹🌹🌹🌷🌷🌷🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

0 Comments