धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या काही दिवसांपूर्वी व्यापाराचे काही अज्ञातांनी गाडीसह 23 लाखांहून अधिकची रक्कम डोळ्यात मिरचीची पूड टाकून पळून नेल्याची घटना घडली होती. या संदर्भात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जालना येथून एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अन्य साथीदारांचा शोध सुरू
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या या जबरी चोरी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कामगिरी केली असून चोरीतील आणखी साथीदारांचा देखील शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे.

0 Comments