Header Ads Widget

*वडजाई रोड विभाग महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार..! सामाजिक कार्यकर्ते जुनेद पठाण यांनी आणला उघडकीस..!*




*सुलतानिया नगर DP नंबर ४७९ जवळील सुलतान हॉटेलच्या मागे विनाकार्यादेश विनापरवानगी, गैरप्रकारे १५० ते २०० मिटर वायर व पोल वाहून नेत असताना रंगेहात पकडले..!*

*सापडलेल्या कर्मचाऱ्यांवर व त्यामागे जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सामजिक कार्यकर्ते जुनेद पठाण यांची मागणी..!*


धुळे दिनांक २६/११/२०२२ शनिवार रोजी सकाळी ११.३० वाजता सुलतानिया नगर DP नंबर ४७९ जवळील सुलतान हॉटेलच्या मागे विनाकार्यादेश, विनापरवानगी, गैरप्रकारे ७ पोलची अंदाजित जवळ जवळ १५० ते २०० मिटर वायर व १ पोल वाहून नेत असताना जुनेद पठाण यांनी फोटो घेतले आणि त्यांना कर्मचारी यांना विचारले असता त्यांना उत्तरे देता आली नाही नंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता श्री. साळुंखे साहेब व कनिष्ठ अभियंता श्री. इंदोले वडजाई रोड यांचे नाव सांगितले. त्यानंतर त्यांनी जुनेद पठाण यांच्या घरी प्रत्यक्ष भेटून याला त्याला फोन करून दबाव टाकून मॅनेज करण्याचा प्रयत्न देखील केला. यांनी त्याआधी व नंतर सुलतानिया फिडर दोन तास बंद ठेवला होता.

यावर सामजिक कार्यकर्ते जुनेद पठाण यांनी विनाकार्यादेश विनापरवानगी, गैरप्रकारे १५० ते २०० मिटर वायर व पोल वाहून नेत असताना रंगेहात सोपडलेल्या कर्मचाऱ्यांवर व त्यामागे जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी  अधिक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, धुळे आणि पोलीस निरीक्षक सो. चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, धुळे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.


*आपला*

*जुनेद पठाण*
*सामाजिक कार्यकर्ता, धुळे जिल्हा*

Post a Comment

0 Comments