Header Ads Widget

*पुणे: 'राष्ट्रीय बालदिवस' व बालवाचनालय स्थापन!*




भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू यांचा जन्मदिवस....त्यानिमित्त वंचित विद्यार्थ्यांच्या शाळेत 'बालदिन' साजरा करावा अशी मनामध्ये इच्छा होती.
 पुणे कलेक्टर ऑफिस समोरील  'बालविकास संस्थेची प्राथमिक शाळा, येथे आज आमचे मित्र व युवक मित्र परिवार संस्था-अध्यक्ष श्री प्रविण महाजन सर यांनी 'बालवाचनालय स्थापन करून विद्यार्थ्यांना खाऊ,चॉकलेट वाटप करत बालदिन साजरा केला. सदर शाळेत वस्ती परिसरतील वंचित बालके शिक्षण घेतात. याच बालकांना लिहता वाचता यावे,अंकज्ञान मिळावे,वाचनाची गोडी लागावी यासाठी 'छान छान गोष्टीची पुस्तके,उजळणी पुस्तके मोफत भेट देण्यात आली.तत्पुर्वी चाचा नेहरू यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी आमचे मित्र व युवक मित्र परिवार संस्था-अध्यक्ष श्री प्रविण महाजन सर यांच्यासह शाळेच्या मुख्यध्यापिका जाधव मॅडम व स्टाफ,विद्यार्थीवृद उपस्थित होते.

🙏🙏🙏💐💐🙏🙏🙏

Post a Comment

0 Comments