Header Ads Widget

*गो. पी. लांडगे यांची परिषदेचे* *उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती*




मुंबई : धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार,परिषदेचे विद्यमान जिल्हा प्रसिध्दी प्रमूख, मराठी पत्रकार परिषदेचे एकनिष्ठ शिलेदार श्री. गो. पी. लांडगे यांची परिषदेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज ही घोषणा केली..
गो. पी. लांडगे हे  ४५ वर्षे पत्रकारितेत आहेत.. एकला चलो रे हे त्यांचे साप्ताहिक  ३६ वर्षे अखंडपणे सुरू आहे..गांधीवादी विचारांचे गो. पी. लांडगे मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाशी गेली अनेक वर्षे जोडले गेलेले आहेत.. परिषदेच्यावतीने त्यांनी अधिस्वीकृती समितीवर देखील काम केलेले आहे.. . सत्शील, हाडाचे पत्रकार म्हणून गोपी लांडगे सर्व मान्य आहेत.. 
उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नगर आदि जिल्ह्यांची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.. विभागीय सचिव त्यांना संघटना वाढीच्या कार्यात सहकार्य करतील असेही शरद पाबळे यांनी स्पष्ट केले आहे.. 
एस.एम देशमुख, किरण नाईक यांनी गो. पी. लांडगे यांचे अभिनंदन केले आहे..

मा, गो. पी. लांडगे यांचे  उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा 

शुभेच्छुक--भालचंद्र पाटील संपादक
सा सुजान नागरिक नरडाणा

Post a Comment

0 Comments