शिरपूर : येथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी चेअरमनपदी भूपेशभाई रसिकलाल पटेल यांची (दि. १२नोव्हें) रोजी बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपा तर्फे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण माजीमंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी मर्यादित शिरपूर या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली होती. चेअरमनपदी भूपेशभाई रसिकलाल पटेल यांची निवड करण्यात आली त्याबद्दल भाजपा तर्फे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, शहर सरचिटणीस रोहित शेटे, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, शहर चिटणीस राधेश्याम भोई, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, योगीराज बोरसे, रमेश चौधरी, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस अजिंक्य शिरसाठ, शहर उपाध्यक्ष अनिल बोरसे, कुणाल माळी, जगन्नाथ पाटील, सुनिल माळी, रविंद्र माळी आदि उपस्थित होते.

0 Comments